खटाव:-चोराडे करांचा नंद्या 1555 jp सुसाट.
प्रतिनिधी नितीन कुलकर्णी:-9921778417

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
चोराडे करांचा नंद्या 1555 jp सुसाट.
खटाव तालुक्यातील चोराडे गावचा नंद्या बैलगाडी शर्यतीत अनेक नामवंत बैलांना मागे टाकत सुसाट सुटला आहे,चोराडे म्हटलं की बैलगाडी क्षेत्रातील नामवंत गाव याच चोराडे गावच नाव घेतल की लोक लगेच जुन्या काळातील बैलगाडी क्षेत्रातील भिवा आण्णा यांचे नाव आवर्जून घेत आहेत, संपुर्ण महाराष्ट्रात ज्या बैलाने धुमाकूळ घातला तोच नामांकित बैल हिंदकेसरी बाज्या.त्यानंतर आता बापु शेठ पिसाळ यांचा घराचा 1555 नंद्या,हिंद केसरी बाज्या नंतर चोराडे गावचे नाव, नावारुपाला आनत आहे.बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठल्यानंतर बापु शेठ पिसाळ यांच्या नंद्या बैलाने पंचोक्रोशीतील अनेक मैदानावर आपले नाव कोरले आहे. चोराडे येथे सुहास दादा पिसाळ यांच्या वाढदिवसानिमित्त बैलगाड्यांच्या शर्यतीत प्रथम क्रमांक पटावत, निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करत नंद्या बैलाची गावातून मिरवणूक काढत, गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली आणि जल्लोष साजरा केला.
यावेळी सर्व चोराडे ग्रामस्थांनी नंद्या बैलाचे स्वागत केले. सोमनाथ शेठ, भास्कर शेठ,बापु शेठ, गणेश शेठ, पिंटू शेठ,राजु शेठ, बालाजी शेठ ,राहुल शेठ,जे पी ग्रुप बेंगलोर, जे पी उद्योग समूह बंगलोर वडुज .यांनी शुभेच्छा दिल्या.