कृषी व व्यापारग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

खटाव तालुक्यातील चोराडे परिसरात रंगु लागल्या हुरडा पार्ट्या …!

प्रतिनिधी अनमोल गुरव खटाव:-9881355582

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

खटाव तालुक्यातील चोराडे परिसरात रंगु लागल्या हुरडा पार्ट्या …!

प्रतिनिधी – अनमोल गुरव
9881355582

चोराडे : खटाव तालुक्यातील चोराडे परिसरातील ग्रामीण भागामध्ये
थंडीच्या मोसमात कोवळ्या कणसापासून तयार केलेला पौष्टिक हुरडा हा स्वादिष्ट ठरत असल्याची प्रतिक्रिया हुरडा पार्ट्या खवय्यांमधून निघत आहे.तरी थंडीचा जोर वाढू लागल्यानंतर कोरड्या ज्वारीच्या कणसापासून ज्वारीचे दाणे भाजून हुरडा खाल्ला जात आहे. सध्या ज्वारीचे पीक खर्चिक असल्यामुळे अलीकडील काळामुळे याचे उत्पादन कमी झाले
आहे.तरीदेखील बऱ्याच शेतकरी खास हुरड्याच्या ज्वारीची पेरणी केली आहे. विशेष प्रकारच्या ज्वारीच्या लागवडीपासून तयार केलेल्या हुरड्यालादेखील मोठी मागणी आहे.

खटाव तालुक्यातील चोराडे परिसरात महिन्याभरापासून सातत्याने थंडी आहे. थंडीचे वातावरण हे हुरड्यासाठी पोषक ठरत आहे.शेतकरी हे नातेवाईक, मित्रमंडळी यांना आमंत्रित करून हुरडा पार्टी देत आहेत. मात्र प्रत्यक्ष शेतामध्ये आणि मोकळ्या वातावरणात जाऊन हुरडा पार्टी करण्याची मजा काही औरच हा मोकळा वेळ आणि वातावरणचा आनंद घेण्यासाठी शहरी भागातील खवय्ये हे ग्रामीण भागाकडे वळत आहे.
त्यामध्ये प्रामुख्याने
शेतामध्ये एका झाडाच्या आजूबाजूला मोठा खड्डा खोदला जातो. त्यामध्ये पाणी मारून त्याला हुरडा भाजण्याइतपत तयार केले जाते. त्याच्यानंतर त्यामध्ये लाकडे टाकून पेटवून दिले जाते. लाकडे पेटल्यानंतर गोवऱ्या टाकल्या जातात. यामध्ये कोवळ्या स्वरूपाचे कणसे भाजली जातात. गरम ज्वारीचे कणसे ही हुरडा म्हणून खाल्ले जाते. तरी हुरडा पार्टीमध्ये हुरडासोबत लसणाची चटणी, शेंगाची चटणी, शेंगाचा कूट, गूळ, भाजलेल्या शेंगा, खोबऱ्याचा कीस,ओला हरभरा देखील हुरडा पार्ट्यांमध्ये रंग भरत आहेत.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button