खटाव:-कानकात्रे गावासाठी 24 ×7 सुधारित योजना मंजूर__डॉक्टर दिलीपराव.
प्रतिनिधी प्रा.दिलीप पुस्तके सातारा:-9890318605

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
कानकात्रे गावासाठी 24 ×7 सुधारित योजना मंजूर__डॉक्टर दिलीपराव.
मायणी प्रतिनिधी_कायम दुष्काळात राहणाऱ्या खटाव तालुक्यातील कानकात्रे येथे नवीन सुधारित 24×7 नळ पाणीपुरवठा योजना मंजूर झाली असल्याची माहिती माजी आमदार डॉक्टर दिलीपराव यळगावकर यांनी दिली अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की खटाव तालुक्यातील सोळा गावांना टेंभू योजनेतून पिण्याचे पाणी हायकोर्टातून मिळवले आता मायणी तलाव उद्भव धरून या 16 गावांना आपण 24×7 योजनेतून नळ पाणीपुरवठा योजना शासन दरबारी मंजूर करणार असून त्यापैकी कानकात्रे गावासाठी 55 लाख 27968 रुपयाची योजना मंजूरी मिळाली याची तांत्रिक मान्यता ही मिळाली आहे वास्तविक टेंभू योजना ही मायणी परिसरातून तरसवाडी घाटातून आटपाडी भागाकडे जाणे गरजेचे होते परंतु राजकीय दबावामुळे सदर योजना चितळी माहुली मार्गे आटपाडी कडे गेली. या ज्या जिल्ह्यात अशी योजना तयार होते त्या जिल्ह्याचा त्या पाण्यावर प्रथम अधिकार असतो यासाठी मी हायकोर्टातून टेंभू योजनेचे पाणी सोळा गावासाठी मिळवले आता या संपूर्ण सोहळा गावात 24 बाय सात योजना शासनाकडून पूर्ण करून घेण्याचा निर्धार केला आहे सदरची योजना मंजूर केल्याबद्दल ग्रामपंचायतीच्या व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला यावेळी किरण जाधव दादासो चव्हाण अमित जाधव शरद जाधव दीपक जाधव अशोक जाधव तानाजी जाधव बाळकृष्ण जाधव दुर्योधन जाधव रामचंद्र नामदेव जाधव सुरज पाटील राजकुमार कचरे अंकुश रजपूत मधुकर कचरे आनंदा शेवाळे पिंटू सोमदे विजय कवडे चंदन वरुडे उपस्थित होते शेवटी किरण जाधव यांनी सूत्रसंचालन व आभार मानले.