ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अलिबाग:-प्रत्येक महिन्यातील तिसऱ्या सोमवारी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन.

प्रतिनिधी आशितोष चव्हाण:-7378619519

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

 

प्रत्येक महिन्यातील तिसऱ्या सोमवारी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन.

अलिबाग,दि.16(जिमाका):-महिलांचे प्रश्न तसेच समस्या सोडविण्यासाठी जिल्हास्तरावर प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या तर तालुका स्तरावर प्रत्येक महिन्याच्या चौथ्या सोमवारी महिला लोकशाही दिन राबविण्यात येतो. सर्व स्तरातील समस्याग्रस्त व पिडीत महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे तसेच त्यांच्या हक्काचे संरक्षण होवून न्याय मिळावा, या दृष्टीने महिलांच्या तक्रारी अडचणीची सोय करण्यासाठी व पिडीत महिलांना सुलभ मार्गदर्शनाची सोय उपलब्ध व्हावी, यासाठी महिला लोकशाही दिन राज्य विभागीय जिल्हा आणि तालुका पातळीवर राबविण्यात येतो.
जिल्हास्तरावर प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तसेच तालुका स्तरावर प्रत्येक महिन्याच्या चौथ्या सोमवारी तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखाली तहसिल कार्यालयात सकाळी 11 वा. या महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. या दिवशी सार्वजनिक सुट्टी आल्यास त्यानंतर येणाऱ्या कामकाजाच्या दिवशी या महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते.
यासाठी समस्याग्रस्त व पिडीत महिलांनी विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक कागदपत्रासह दोन प्रतीत सादर करणे आवश्यक आहे. अर्जाची आगाऊ प्रत महिला लोकशाही दिनाच्या 15 दिवस अगोदर पाठविणे आवश्यक आहे. या लोकशाही दिनात न्यायप्रविष्ठ प्रकरणे, विहित नमुन्यात नसणारे व आवश्यक त्या कागदपत्राच्या प्रती न जोडलेले अर्ज, सेवा विषयक आस्थापना विषयक बाबी, तक्रार, निवेदन वैयक्तिक स्वरुपाची नसेल तर ते महिला लोकशाही दिनात स्वीकारले जाणार नाही.
महिलांच्या समस्यांचे निराकरण स्थानिक पातळीवर झाल्यास त्यांना आपल्या न्याय हक्कासाठी इतरत्र कोठेही जाण्याची आवश्यकता भासणार नाही, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्री.विनीत म्हात्रे यांनी केले आहे.
या महिला लोकशाही दिनाच्या तक्रारीबाबत अधिक माहितीसाठी जिल्हा परिविक्षा अधिकारी श्रीमती एस.एम.वाघमारे भ्रमणध्वनी क्र. 9834746068 यांना संपर्क करावा,असेही त्यांनी कळविले आहे

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button