आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

श्रीरामपूर:-चिंचविहिरेत माजी विद्यार्थी मेळावा; शिक्षणाप्रती सामाजिक बांधिलकीचे दर्शन!

पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

चिंचविहिरेत माजी विद्यार्थी मेळावा; शिक्षणाप्रती सामाजिक बांधिलकीचे दर्शन!

​चिंचविहिरे शाळेत माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात; रंगकाम, ग्रंथालय व देणग्यांतून दातृत्वाचे दर्शन

‘स्पेलिंग बी’ स्पर्धेतील गुणवंतांचा गौरव
​चिंचविहिरे (प्रतिनिधी):
तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंचविहिरे येथे माजी विद्यार्थी मेळावा मोठ्या उत्साहात आणि भावुक वातावरणात संपन्न झाला. जुन्या आठवणींना उजाळा देत माजी विद्यार्थी व ग्रामस्थांनी एकत्र येत शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी मोलाचा हातभार लावण्याचा निर्धार यावेळी केला.
​या मेळाव्यात शाळेच्या भौतिक सुविधेचा कायापालट करण्यासाठी सर्व माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन संपूर्ण शाळेला स्वखर्चाने रंगकाम करून देण्याचे जाहीर केले. या रंगकामाच्या उपक्रमास हातभार म्हणून गावातील ज्येष्ठ नागरिक श्री. तुकाराम मोरे यांनी रोख ₹५००/- ची वर्गणी दिली. तसेच गावातील शिक्षक श्री. गोरक्षनाथ धामोरे सर यांनी आपल्या मुलीच्या शुभविवाहातील पाहुण्यांच्या सत्काराचा अनावश्यक खर्च टाळून, सामाजिक बांधिलकी जपत शाळेच्या शैक्षणिक विकासासाठी ₹५,०००/- ची रोख देणगी जाहीर करून समाजात नवा आदर्श निर्माण केला. यासोबतच गावचे माजी सरपंच श्री. राजेंद्र धामोरे यांनी विद्यार्थ्यांच्या वाचनसंस्कृतीला बळ मिळावे म्हणून शालेय ग्रंथालयासाठी १० उपयुक्त पुस्तके देण्याचे जाहीर केले. दात्यांच्या या सहकार्याबद्दल शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे विशेष आभार मानण्यात आले.
​‘स्पेलिंग बी’ स्पर्धेतील गुणवंतांचा सन्मान:
विद्यार्थ्यांच्या इंग्रजी भाषेचा पाया पक्का व्हावा यासाठी शाळेत राबविण्यात आलेल्या ‘स्पेलिंग बी’ उपक्रमातील यशस्वी विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये प्रथम क्रमांक कु. आराध्या राजेंद्र शिंदे, द्वितीय क्रमांक कु. वैदेही दत्तात्रय नालकर व तृतीय क्रमांक चि. जयराज सचिन नालकर यांनी पटकावला.
​कार्यक्रमास सरपंच व ग्रामपंचायत पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक वृंद, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व पदाधिकारी, माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button