खेड-(पुणे):-कडूस खून प्रकरणातील आरोपीला जिल्हा व सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर.
पत्रकार जीत बांदल

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

खेड-(पुणे):-कडूस खून प्रकरणातील आरोपीला जिल्हा व सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर.

खेड, पुणे : येथील बहुचर्चित कडूस खून प्रकरणातील आरोपी प्रणय नवले याला जिल्हा व सत्र न्यायालय, खेड येथून जामीन मंजूर झाला आहे. न्यायाधीश कानडे यांच्या न्यायालयाने जामीन अर्जावर सुनावणी घेऊन दिनांक ०५ ऑक्टोबर २०२६ रोजी आरोपीला जामिनावर मुक्त करण्याचे आदेश दिले.
सदर घटना जून २०२५ मध्ये मुलीची छेड काढण्याच्या वादातून घडल्याचे सांगितले जाते. या प्रकरणात प्रणय नवले याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर आरोपीच्या वतीने ॲड. प्रबोधन जाधव यांच्यामार्फत जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता.
सदर जामीन अर्जावर झालेल्या सुनावणीदरम्यान आरोपीच्या वतीने ॲड. प्रबोधन जाधव यांनी न्यायालयात युक्तिवाद केला. त्यानंतर न्यायालयाने आरोपीला जामीन मंजूर केला.
दरम्यान, आरोपीला जामीन मंजूर झाला असला, तरी खुनाच्या गुन्ह्याचा नियमित खटला न्यायालयात सुरू राहणार आहे.




