आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पुणे:-NMMS शिष्यवृत्ती परीक्षेच्या अर्जासाठी मुदतवाढ; २२ ऑक्टोबरपर्यंत नियमित शुल्कासह अर्जाची संधी.

पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

पुणे:-NMMS शिष्यवृत्ती परीक्षेच्या अर्जासाठी मुदतवाढ; २२ ऑक्टोबरपर्यंत नियमित शुल्कासह अर्जाची संधी.

विलंब शुल्कासह २८ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार; २० डिसेंबर रोजी परीक्षा.

पुणे :- इयत्ता आठवीतील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्ती (NMMS) परीक्षेच्या सन २०२६-२७ साठी ऑनलाइन अर्ज भरण्याच्या मुदतीत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांनी दुसऱ्यांदा वाढ केली आहे. त्यानुसार, नियमित शुल्कासह २२ ऑक्टोबर २०२६ पर्यंत, तर विलंब शुल्कासह २८ ऑक्टोबर २०२६ पर्यंत अर्ज भरता येणार आहेत.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या उपायुक्त तथा प्रभारी आयुक्त निशादेवी भंडगर यांनी यासंदर्भात जाहीर प्रकटन प्रसिद्ध केले आहे. या मुदतवाढीमुळे अद्याप अर्ज न भरलेल्या विद्यार्थ्यांना आणि शाळांना अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त वेळ मिळणार आहे.
या परीक्षेसाठी शाळांची नोंदणी आणि विद्यार्थ्यांचे ऑनलाइन आवेदनपत्र भरण्याची प्रक्रिया www.mscepune.in आणि www.mscenmms.in या अधिकृत संकेतस्थळांवरून पूर्ण करावी लागणार आहे.
सुधारित वेळापत्रकानुसार, नियमित शुल्कासह अर्ज भरण्याची मुदत २२ ऑक्टोबरपर्यंत आहे. त्यानंतर २२ ते २८ ऑक्टोबरदरम्यान विलंब शुल्कासह अर्ज भरता येतील. अतिविलंब शुल्कासह अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध नसल्याचेही प्रकटनात नमूद करण्यात आले आहे.
२८ ऑक्टोबर २०२६ नंतर कोणत्याही परिस्थितीत ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, असे परीक्षा परिषदेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे पात्र विद्यार्थ्यांनी आणि संबंधित शाळांनी अंतिम मुदतीची वाट न पाहता अर्ज प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, NMMS शिष्यवृत्ती परीक्षा २० डिसेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात येणार आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळविण्याची संधी या परीक्षेच्या माध्यमातून उपलब्ध होते.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button