क्राईम न्युजग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भुईंज:- १२ तासांत दरोड्याचा पर्दाफाश! १ कोटी ५५ लाखांचे दागिने हस्तगत; ८ दरोडेखोर जेरबंद!

पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला संघटक

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

भुईंज दि.18

भुईंज:-स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांची उल्लेखनिय कामगिरी,- कवठे ता.वाई जि.सातारा गावच्या हद्दीत कोयत्याचा धाक दाखवून सोन्या चांदीचे दागिने चोरी केलेला धाडसी दरोडा (Road Robbery) चा गुन्हा 12 तासाचे आत उघड करुन 1 कोटी 55 लाख 27 हजार 258 रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने हस्तगत करुन 8 दरोडेखोर जेरबंद.

दिनांक 16/10/2026 रोजी सकाळी 07.00 वा.च्या सुमारास मार्क एक्सप्रेस कुरिअर कोल्हापूर कंपनीची महिंद्रा बोलेरो पिकअप क्रमांक MH-09-FL-5423 हि पुण्यावरुन कोल्हापूर बाजूकडे जात असताना 8 इसमांनी तीन मोटार सायकल वरुन खेड शिवापूर व कापुरहोळ येथून पाठलाग करुन कवठे ता.वाई जि.सातारा गावचे हद्दीत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 वर पिकअप गाडीस मोटार सायकल आडवी मारुन, पिकअप थांबवून, पिकअप मधील चालकास कोयत्याचा धाक दाखवून त्यास शिवीगाळ, दमदाटी, मारहाण करुन पिकअप गाडीचा पाठीमागील दरवाजा उघडून गाडीतील सोन्या चांदीचे दागिने तसेच चांदीच्या विटा असलेले पोते जबरदस्तीने चोरी करुन घेवून गेले म्हणून दिले फिर्यादीवरुन भुईंज पोलीस ठाणे गु.र.नं.330/2026 BNS कलम 310(2), 126 अन्वये दाखल करण्यात आला होता.
श्री.निखील पिंगळे पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती डॉ.वैशाली कडुकर अपर पोलीस अधीक्षक सातारा व श्री.विपुल पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी सातारा उपविभाग चार्ज वाई उपविभाग यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून तात्काळ गुन्हयाचे घटनास्थळी भेट दिली. धाडसी दरोडा (Road Robbery) च्या गुन्हयातील अज्ञात आरोपींबाबत माहिती प्राप्त करुन सदरचा गुन्हा तात्काळ उघडकीस आणण्याच्या सुचना परि.पोलीस उपअधीक्षक पुनम झगडे, पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके स्थानिक गुन्हे शाखा व सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे भुईंज पोलीस ठाणे, सहायक पोलीस निरीक्षक सुशील भोसले वाठार पोलीस ठाणे यांना दिल्या.
पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांनी तात्काळ सहायक पोलीस निरीक्षक अभिजीत यादव, रोहित फार्णे, पोलीस उपनिरीक्षक परितोष दातीर, चंद्रकांत पुजारी यांचे अधिपत्याखाली स्थागुशा कडील पोलीस अंमलदार यांची तपास पथके तयार केली. तपास पथकांना सदरचा गुन्हयातील अज्ञात आरोपींबाबत माहिती प्राप्त करुन सदरचा गुन्हा तात्काळ उघडकीस आणून चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्याचे आदेश दिले.
स्थानिक गुन्हे शाखेकडील, भुईंज पोलीस ठाण्याकडील, वाठार पोलीस ठाण्याकडील तसेच सातारा शहर व कराड शहर गुन्हे प्रकटीकरणाचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांची तपास पथके गुन्हयातील आरोपींची CCTV फुटेज व तांत्रिक विश्लेषनाद्वारे माहिती मिळविण्याचा प्रयत्न करीत असताना पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांना त्यांच्या विश्वसनीय बातमीदारामार्फत माहिती प्राप्त झाली की, मंगेश एकनाथ जाधव, ऋतिक रमेश कदम, सोमनाथ प्रमोद गोडसे सर्व रा.मालगाव ता.जि.सातारा हे व त्यांचे 5 साथिदार यांच्या संशईत हलचाली बाबत माहिती प्राप्त झाली, प्राप्त माहितीच्या अनुशंगाने पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांनी स्थागुशाकडील तपास पथकांना पोलीस अभिलेखावरील आरोपी मंगेश एकनाथ जाधव, ऋतिक रमेश कदम, सोमनाथ प्रमोद गोडसे सर्व रा.मालगाव ता.जि.सातारा हे व त्यांचे 5 साथिदार यांच्या ठावठिकाण्याबाबत माहिती प्राप्त करुन त्यांना ताब्यात घेवून पुढील कायदेशीर कारवाई करण्याच्या सुचना दिल्या. तपास पथकांनी नमुद आरोपीं बाबत माहिती प्राप्त करुन त्यांना गुन्हयाचे कामी ताब्यात घेतले.
ताब्यात घेतलेल्या आरोपींच्याकडे गुन्हयाच्या अनुशंगाने विचारपुस केली असता गुन्हयातील एक आरोपी गोपीनाथ तानाजी कदम रा.मालगाव ता.जि.सातारा हा कराड येथे कुरिअर कंपनीमध्ये कामाला आहे, त्यामुळे त्याला मार्क एक्सप्रेस कुरिअर कोल्हापूर कंपनीची पिकअप केव्हा कोल्हापूर वरुन पुण्याला जाते व केव्हा पुण्यावरुन कोल्हापूरला जाते याबाबत माहिती होती, म्हणून त्याने आरोपी मंगेश एकनाथ जाधव याला दिनांक 16/10/2026 रोजी सकाळी पिकअप क्रमांक MH-09-FL-5423 ही पुण्यावरुन कोल्हापूर येथे जाणार असून त्यामध्ये सोन्या चांदीचे दागिने आहेत अशी माहिती दिली. त्यानंतर गोपीनाथ तानाजी कदम, मंगेश एकनाथ जाधव, ऋतिक रमेश कदम, आदित्य हणमंत कदम, सोमनाथ प्रमोद गोडसे, निखील दिलीप कदम, अक्षय शांताराम मोझर सर्व रा.मालगाव ता.जि.सातारा व निषीध शरद साबळे रा.शिवथर ता.जि.सातारा यांनी सदरची गाडी लुटण्याचा प्लॅन केला. त्यानंतर दिनांक 16/10/2026 रोजी आरोपी ऋतिक रमेश कदम व आदित्य हणमंत कदम यांनी पल्सर मोटार सायकवरुन पिकअप क्रमांक MH-09-FL-5423 चा खेड शिवापूर टोलनाका येथून पाठलाग केला. कापुरहोळ येथून आरोपी सोमनाथ प्रमोद गोडसे, मंगेश एकनाथ जाधव व निखील दिलीप कदम यांनी युनिकॉन मोटार सायकलवरुन आरोपी निषीद शरद साबळे व अक्षय मोझर यांनी होंडा शाईन मोटार सायकलवरुन पिकअपचा पाठलाग केला. पिकअप गाडी कवठे ता.वाई जि.सातारा गावच्या हद्दीत आल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 वर पिकअपला आरोपी सोमनाथ गोडसे, मंगेश जाधव व निखील कदम यांनी युनिकॉन मोटारसायकल आडवी मारली. मंगेश जाधव याने चालकास कोयता दाखवून त्यास दमदाटी केली इतर आरोपींनी पण चालकास शिवीगाळ दमदाटी करुन मारहाण केली. आरोपी ऋतिक कदम व आदित्य कदम यांनी पिकअपचा पाठीमागील दरवाजा उघडून त्यामधून सोन्या चांदीचे दागिने व चांदीच्या विटा जबरदस्तीने चोरी केल्या आहेत असे सांगीतल्याने नमुद 8 आरोपींना गुन्हयाचे कामी अटक केली. त्यांचेकडून गुन्हयात चोरीस गेलेले 1 कोटी 55 लाख 27 हजार 258 रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने व चांदीच्या विटा हस्तगत केले. वरील आरोपींनी टाकलेला धाडसी दरोडा (Road Robbery) चा गुन्हा 12 तासाचे आत उघडकीस आणून उल्लेखनिय कामगिरी केली आहे.
श्री.निखील पिंगळे पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती डॉ.वैशाली कडुकर अपर पोलीस अधीक्षक सातारा, श्री.विपुल पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी सातारा उपविभाग, श्री.सुनिल साळूंखे उपविभागीय पोलीस अधिकारी वाई उपविभाग यांचे मार्गदर्शनाखाली परि.पोलीस उपअधीक्षक पुनम झगडे, पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके स्थानिक गुन्हे शाखा सातारा, सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, सुशील भोसले, राजेश माळी, अभिजीत यादव, रोहित फार्णे, पोलीस उपनिरीक्षक परितोष दातीर, चंद्रकांत पुजारी, सुरज शिंदे, आकाश मोरे स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस अंमलदार अतिष घाडगे, राजू मुलाणी, विजय कांबळे, संजय शिर्के, संतोष सपकाळ, शरद बेबले, लक्ष्मण जगधने, लैलेश फडतरे, सचिन साळूंखे, प्रविण फडतरे, हणमंत भोसले, नवनाथ कदम, राकेश खांडके, हसन तडवी, सनी आवटे, अजय जाधव, सुजित भोसले, अरुण पाटील, अविनाश चव्हाण, अमित माने, स्वप्नील कुंभार, ओंकार यादव, स्वप्नील शिंदे, किरण जगताप, मोहन पवार, विशाल पवार, रोहित निकम, पृथ्वीराज जाधव, महेश निर्मळ, स्वप्नील लोखंडे, इरफान मुलाणी, संकेत निकम, संजय जाधव, अमृत कर्पे, विजय निकम, आनंदा भोये, महेश जाधव, शकुंतला सणस, आदिका वीर भुईंज पोलीस ठाण्याकडील पोलीस अंमलदार नितीन जाधव, सोमनाथ बल्लाळ, सागर मोहिते यांनी सदरची कारवाई केली असून कारवाई मधील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे श्री.निखील पिंगळे पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती डॉ.वैशालीx कडुकर अपर पोलीस अधीक्षक सातारा, श्री.विपुल पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी सातारा उपविभाग व श्री.सुनिल साळूंखे उपविभागीय पोलीस अधिकारी वाई उपविभाग यांनी अभिनंदन केले आहे.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button