कृषी व व्यापारग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय
राहाता:-कोल्हारकरांसाठी ऐतिहासिक क्षण! छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचे दिमाखात अनावरण.
पत्रकार आदिनाथ कडू अहिल्यानगर जिल्हा अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

कोल्हारकरांसाठी ऐतिहासिक क्षण! छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचे दिमाखात अनावरण.

पालकमंत्री डॉ.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते अनावरण; डॉ. सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत हजारो शिवभक्तांचा उत्स्फूर्त सहभाग.
राहाता तालुक्यातील कोल्हार-भगवतीपूर परिसरातील शिवप्रेमींच्या अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचा अनावरण सोहळा सोमवारी (दि. १९ ऑक्टोबर) मोठ्या उत्साहात संपन्न झाला. राज्याचे जलसंपदामंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. या सोहळ्याला हजारो शिवभक्तांनी उपस्थिती लावत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून सोडला.




