सांगली:-प्रामाणिक कर्म ही सर्वश्रेष्ठ पूजा आहे_____नंदकुमार जोशी.
प्रतिनिधी प्रा.दिलीप पुस्तके सातारा:-9890318605

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
प्रामाणिक कर्म ही सर्वश्रेष्ठ पूजा आहे_____नंदकुमार जोशी.
प्रतिनिधी___जन्म व मृत्यू या दोन गोष्टी मानवाच्या आधीन नाहीत पण कर्म हे मानवाच्या हातात आहे प्रामाणिक कर्म ही सर्वश्रेष्ठ पूजा आहे प्रामाणिक काम करताना ते कर्म
सत्कर्म असावे असे कर्म केल्यानंतर मंदिरात कीर्तनात भजनात जाण्याची आवश्यकता नाही असे स्पष्ट मत वेदमूर्ती नंदकुमार जोशी यांनी सांगली येथील ज्योतिष अधिवेशनात बोलताना व्यक्त केली. येथील ज्योतिष विद्यावाचस्पती कैलासवासी अवधूत जरे गुरुजी यांच्या तृतीय पुण्यस्मरण निमित्त ग्रह संकेत विद्यालय राजाराम नगर इस्लामपूर यांच्या विद्यमाने ज्योतिष अधिवेशन व पदवीदान समारंभ आयोजित केला होता या कार्यक्रमास मिलिंद कलेढोणकर डॉक्टर मनीषा राक्षे सौआरती वैद्य श्री गुमासते श्री गुरुजी यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाचे संयोजक श्रीधर कुलकर्णी यांनी उपस्थितांचे स्वागत करून कार्यक्रमाचा हेतू कथन केला आजच्या ज्योतिषाने गुरु बद्दल नितांत आदर ठेवावा अशी अपेक्षा व्यक्त केली डॉक्टर मनीषा राक्षे यांनी अंकाचे चमत्कार चार व आठ या अंकाची जादू भाग्यांक व प्रारब्ध कसा शोधावा याविषयी मार्गदर्शन केले मिलिंद कलेढोणकर सातारा यांनी शनी बद्दल समज गैरसमज याबद्दल सविस्तर माहिती दिली यावेळी प्राचार्य श्रीधर कुलकर्णी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे वाटप करण्यात आली याचवेळी गुमासते गुरुजी यांनी श्री यंत्राचे महत्व याविषयी व्याख्यान दिले या कार्यक्रमास सांगली सातारा कोल्हापूर व सोलापूर जिल्ह्यातील ज्योतिष प्रेमी हितचिंतक मोठ्या प्रमाणे उपस्थित होते शेवटी श्रीधर कुलकर्णी यांनी सर्वांचे आभार मानले.