क्राईम न्युजग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
गंगापुरः वाळूज महानगर येथे ट्रान्सपोर्ट कंपनीच्या आवारातुन 55 हजारांच्या सामानाची चोरी.
प्रतिनिधी अमोल चव्हाण:-7397937231

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
वाळुज महानगर औद्योगिक नगरीतील एका ट्रान्सपोट्र कंपनीच्या आवारातुन 55 हजारांचे साहित्य चोरणार्या विरूद्ध MIDC वाळुज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मुंबई येथुन 24 जानेवारी ला बॉटको ट्रान्सपोर्ट कंपनीत कॉपर पट्टी चे बंडल्स व पाच लोखंडी प्लेटा असे मटेरियल आले होते.कंपनीच्या कर्मचार्यानी हे मटेरीयल ट्रान्सपोर्ट कंपनी समोरील मैदानात ठेवले होते.ते चोरीला गोले, कंपनीचे व्यवस्थापक शकिल बोकल यांनी MIDC वाळुज पोलिस ठाण्यात या बाबत गुन्हा दाखल केला आहे.या गुन्ह्याची तपासनी उपनिरीक्षक चेतन ओगले करीत आहे.