पुणे:-वाकड-दोन जणांवर जातिवाचक शिवीगाळ प्रकरणी अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल.
प्रतिनिधी शफिक शेख निगडी पुणे:-9767275783

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
दोन जणांवर जातिवाचक शिवीगाळ
प्रकरणी अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल
वाकड, दि. 09 (शफिक शेख) :- सेकंड हॅंड वाहन खरेदीप्रकरणी सुमारे 9 लाख रूपयांची फसवणूक आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी वाकड येथील अभय लायगुडे आणि आशिष लायगुडे यांच्या विरोधात वाकड पोलिसांनी फिर्यादी मनोज जालिंदर कसबे यांच्या तक्रारीवरून अॅट्रॉसिटी अॅक्ट आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
यबाबत सविस्तर माहिती अशी की, फिर्यादी मनोज कसबे यांच्यात आणि आरोपी अभय लायगुडे आणि आशिष लागुडे यांच्या दरम्यान एमएच 14 एचसी 9900 या ब्लॅक कलरच्या फॉर्चुनर कार खरेदीचा व्यवहार 28,72,800/- मध्ये ठरला असताना आणि ती पूर्ण रक्कम फिर्यादी यांनी आरोपी यांना दिली असतानाही केवळ फिर्यादी हे मांग जातीचे आहेत आणि ते तुच्छ जातीचे आहेत या कारणावरून आरोपी यांनी फिर्यादी कसबे यांना जातीवाचक शिवीगाळ केली आणि एकूण रकमेपैकी केवळ 20,00,000/- रूपये परत करून व्यवहार मोडला. फिर्यादी यांनी बाकी असलेली 872800 रूपये परत मागितले असता त्यांना जातीवाचक शिवीगाळ करून आणि अपमान करून बाहेर काढले यावरून फिर्यादी यांनी वाकड पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली असता पोलीस उपनिरीक्षक अतुल जाधव यांनी आरोपी अभय लायगुडे आणि आशिष लायगुडे यांच्या विरोधात भा. दं. वि. कलम 420, 34, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कलम 3(1)(आर), 3(1)(झेड सी), आणि नागरी हक्क संरक्षण 7(1)(डी) अंतर्गत गुन्हा दाखल केला. आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही.
या प्रकरणाचा पुढील तपास सहा. पोलीस आयुक्त श्रीकांत देसले यांच्याकडे आहे. त्यांच्याशी आमचे प्रतिनिधी शफिक शेख यांनी फोनवरून विचारले असता श्री. देसले यांनी सांगितले की अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारची अटक करण्यात आलेली नाही. याप्रकरणी फिर्यादी कसबे यांनी त्यांची कोणतीही तक्रार नसल्याचे पत्र श्री. देसले यांच्याकडे दिले आहे. तरी याबाबत अधिक सखोल तपास आपण करित असल्याचे श्री. देसले यांनी सांगितले.