सातारा:-निर्माण बहुउद्देशीय विकास संस्था सातारा व सातारा जिल्हा पोलीस दल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित.
पत्रकार मारुती सोमुत्ते पुणे जिल्हा उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार मारुती सोमुत्ते पुणे जिल्हा उपाध्यक्ष
RPS STAR NEWS
दिनांक – १३/०७/२०२४
निर्माण बहुउद्देशीय विकास संस्था सातारा व सातारा जिल्हा पोलीस दल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित.
बालस्नेही पोलीस स्टेशन संकल्पना व बालकल्याण पोलीस अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या या विषयावर आधारित एक दिवसीय कार्यशाळा.
◆ प्रकल्पाचे नाव – निर्भया प्रकल्प, सातारा
◆ *उपक्रमाचे उददी्ष्ट –
१) बालस्नेही पोलीस स्टेशन संकल्पना व मार्गदर्शक तत्वे समजावून सांगणे,
२) बालकल्याण पोलीस अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या सांगणे,
३) बालकल्याण पोलीस अधिकाऱ्यांना येणाऱ्या अडचणी यावर चर्चा करणे,
४) बालक व महिलां संबंधित नवीन फौजारी कायद्यातील तरतूद समजून घेणे,
◆ *ठिकाण – पोलीस करमणूक केंद्र, राजपथ रोड, सातारा.
◆ *सहभागी व संख्या – ६७
◆ संसाधन व्यक्ती- १) *मा. सुमित्रा अष्टेकर – बालहक्क तज्ञ व बालकल्याण समिती मंडळ, पश्चिम महाराष्ट्र
२) मा. ॲड सुचित्रा काटकर*l – अध्यक्ष बालकल्याण समिती सातारा
३) मा. ॲड आकाश महंगाडे सर- मुख्य विधी सहाय्यक बचाव सल्लागार सातारा
◆ उपक्रमाची सविस्तर माहिती– कार्यशाळेची सुरुवात उद्घाटन व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत याने करण्यात आली. सदरची कार्यशाळा ही एकूण ४ सत्रामध्ये मध्ये घेण्यात आली.
प्रथम सत्रांमध्ये बालस्नेही संकल्पना म्हणजे काय, बालस्नेही वातावरण कशा पद्धतीचे असले पाहिजे, बालकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा असावा, कोणते शब्द वापरायला हवे, बालकांच्या केस हाताळताना गुप्तता आणि गोपनीयता कशा पद्धतीने पाळवी याबाबत मार्गदर्शन व चर्चा करण्यात आली.
दुसऱ्या सत्रामध्ये बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम २०१२ हा कायदा नक्की काय आहे, कोणासाठी कायदा तयार केला गेला आहे, कायद्याचे उद्देश काय आहे, कायद्यानुसार मूल म्हणजे नक्की कोण, वैशिष्ट्ये व जबाबदाऱ्या, कोणत्या बालकाला बालकल्याण समिती समोर हजर करावे व बालकाचे नाव प्रथम माहिती अहवालामध्ये लिहिणं गरजेचं आहे की नाही यावर मार्गदर्शन व चर्चा करण्यात आली.
तिसऱ्या सत्रांमध्ये लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचे संरक्षण कायदा २०२१२ च्या केसेस हाताळताना बालकल्याण पोलीस अधिकाऱ्यांना येणाऱ्या अडचणी यावर एक चर्चासत्र घेण्यात आले.
चौथ्या सत्रामध्ये बालक व महिलांसंबंधीत नवीन फौजदारी कायद्यामध्ये तरतूद काय झाली आहे हे समजून घेण्यात आले.
◆ कार्यक्रमांस उपस्थित प्रतिनिधी – सदरच्या कार्यशाळेमध्ये सातारा जिल्हा पोलिस दल अधिकारी व कर्मचारी, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय येथील प्रतिनिधी, बालकल्याण समिती सातारा अध्यक्ष व सदस्य, समुपदेशक, बाल कल्याण पोलीस अधिकारी व निर्माण संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन वैशाली भांडवलकर व विक्रांत मोरे तसेच सूत्रसंचालन काजल गायकवाड यांनी केले.