सिंधुदुर्ग:-दोडामार्ग : विजघर येथील तपासणी नाक्यावर गोवा बनावटीच्या अवैध दारू वाहतुकीवर येथील पोलिसांनी कारवाई – ९ लाख ८८ हजार ५६० रुपयांचा मुद्देमाल जप्त.
पत्रकार शैलेश मेस्त्री सिंधुदुर्ग जिल्हा कार्याध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
दोडामार्ग : विजघर येथील तपासणी नाक्यावर गोवा बनावटीच्या अवैध दारू वाहतुकीवर येथील पोलिसांनी कारवाई – ९ लाख ८८ हजार ५६० रुपयांचा मुद्देमाल जप्त.
दोडामार्ग : विजघर येथील तपासणी नाक्यावर गोवा बनावटीच्या अवैध दारू वाहतुकीवर येथील पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत ९ लाख ८८ हजार ५६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी संशयित महेंद्र गंगाराम खरवत (वय २१ वर्षे, रा. कुडासे वानोशीवाडी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांनी दिली.
अशोक लेलँड कंपनीचा एक टेम्पो बुधवारी सकाळच्या सुमारास दोडामार्गहून वीजघर मार्गे घाटमाथ्यावर जात होता. वीजघर येथील तपासणी नाक्यावर टेम्पो पोहोचला असता तेथे कार्यरत असलेले पोलीस नाईक विजय जाधव यांनी तो तपासणीसाठी थांबविला. टेम्पोच्या हौद्यात दारूचे बॉक्स असल्याचे त्यांना दिसले. त्यामुळे त्यांनी टेम्पोची झाडाझडती सुरू केली. यावेळी टेम्पो मोठ्या प्रमाणावर त्यांना दारू आढळून आली. रॉयल सिलेक्ट डीलक्स व्हिस्की असे इंग्रजी लेबल असलेल्या गोवा बनावटीचे ५ लाख ३८ हजार ५६० रुपयांची अवैध दारू मिळाली.
पोलिसांनी दारूसह सुमारे ४ लाख ५० हजार रुपयांचा टेम्पोही जप्त केला. तसेच या प्रकरणी चालक महेंद्र गंगाराम खरवत याच्यावर स्वतःच्या आर्थिक फायदा करिता गैर कायदा विनापरवाना गोवा बनावटीचे अवैध दारू बाळगून वाहतूक करीत असताना मिळून आला म्हणून महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम ६५ (अ) (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास पोलीस नाईक श्री. साटेलकर करत आहेत, अशी माहिती पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांनी दिली.