वाई:- मॉरिशसने भारतीय संस्कृती जपली. – मा.डॉ.विपीन वैराट.
पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला PRR

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला PRR
वाई दि 13
मॉरिशसने भारतीय संस्कृती जपली. – मा. डॉ . विपीन वैराट.
इंग्रजांनी मजुर म्हणून नेलेले भारतीय नागरिक तिथेच स्थायिक झाले. त्या लोकांची स्मृती म्हणून त्यांच्या पुढील पिढीने अजूनही भारतीय संस्कृती जपली आहे असे प्रतिपादन डॉ . विपीन वैराट यांनी केले.
येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या मौजे शेंदुरजणे येथील विशेष श्रमसंस्कार शिबिरात माझा मॉरिशस प्रवास या विषयावर प्रबोधन पर व्याख्यानात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. मुख्याध्यापक संजय कुंभार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी सरपंच रेखा जगताप , विलास जगताप, संजय भिकू जाधव, डॉ . विनोद वीर, प्रकल्प अधिकारी डॉ. संग्राम थोरात डॉ.अंबादास सकट यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. वैराट म्हणाले, तीर्थाटन केल्याने ज्ञानेश्वर संत पदापर्यंत पोचले. आपणही भ्रमंती केल्यास आपल्या ज्ञानात भर पडते. मलाही मॉरिशसच्या प्रवासातून नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. पहिला विमान प्रवास, एयर होस्टेसचा उत्साह, मॉरिशियन लोकांचे भारतीय संस्कृतीवरील प्रेम, त्यांचे शिस्तबद्ध वागणे तिथे अनुभवायला मिळाले. निसर्गाचे जतन व संवर्धन कसे करावे हे मॉरिशियन लोकांकडून शिकावे.
आपल्या अध्यक्षीय मनोगतात मुख्याध्यापक कुंभार म्हणाले, विद्यार्थ्यांनी हॉटस्अप, फेसबुक, इन्स्टाग्राम यातून बाहेर पडावे व जिल्हा, राज्य, देश व परदेशात भ्रमंती करावी. भ्रमंतीने आपले व्यक्तिमत्व विकसीत होते.
सानिका गाढवे हिने प्रास्ताविक केले. प्रिशा साळुंखे हिने स्वागत केले. वैष्णवी मांढरे हिने पाहुण्यांची ओळख करून दिली. ऐश्वर्या हिरवे हिने सूत्रसंचालन केले. संध्या मांढरे हिने आभार मानले.
कार्यक्रमास नीलम भोसले , डॉ. मृणाली वाईकर, सुनील दगडे, शेंदुरजणे गावातील ग्रामस्थ व एन.एस.एसचे स्वयंसेवक उपस्थित होते.