ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पारनेरचा शिव पाणंद पॅटर्न राज्याला दिशादर्शक.

पत्रकार राजकुमार इकडे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

पारनेरचा शिव पाणंद पॅटर्न राज्याला दिशादर्शक.

ई-मोजणी 2.0 मध्ये शेतरस्त्यांची नोंद; अक्षांश-रेखांशासह अंतिम ‘क’ प्रत देण्याचे निर्देश.

पारनेर :(राजकुमार इकङे )ई-मोजणी 2.0 प्रणालीचा प्रभावी वापर करून शिव पाणंद शेतरस्ते, पाणंद रस्ते, हद्द निश्चिती व अतिक्रमणासह सर्व मोजणी प्रकरणांची ऑनलाइन नोंदणी करावी. तसेच मोजणीचा अंतिम नकाशा अक्षांश-रेखांशासह ‘क’ प्रतीच्या स्वरूपात उपलब्ध करून द्यावा, असे निर्देश पारनेर तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी यांनी भूमी अभिलेख विभागाला दिले आहेत.

याबाबत तहसीलदार गायत्री सौंदाणे यांनी १० ऑगस्ट २०२६ रोजी उपअधीक्षक, भूमी अभिलेख, पारनेर यांना पत्र दिले असून, जमाबंदी आयुक्त तथा संचालक, भूमी अभिलेख, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या २५ जून २०२६च्या परिपत्रकाचा त्यात संदर्भ देण्यात आला आहे.
ई-मोजणी 2.0, GIS व GNSS तंत्रज्ञानामुळे मोजणीतील प्रत्येक हद्दबिंदूचे Latitude व Longitude उपलब्ध होणार आहे. त्यामुळे शेतरस्त्यांची रुंदी, जमिनीच्या हद्दी, अतिक्रमण तसेच सीमावादाच्या प्रकरणांत अचूकता आणि पारदर्शकता वाढण्यास मदत होणार आहे.
अक्षांश-रेखांश नसलेला मोजणी नकाशा वितरित करू नये, तसेच सर्व मोजणी प्रकरणांची ई-मोजणी 2.0 मध्ये नोंदणी करून शासनाच्या निर्देशांची काटेकोर अंमलबजावणी करावी, असेही निर्देश देण्यात आले आहेत. नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून नियमानुसार कारवाई करण्याची सूचनाही करण्यात आली आहे.
दरम्यान, नमुना १-फ मधील सर्व रस्त्यांची ऑनलाइन नोंदणी तसेच छत्रपती महाराजस्व अभियानातील गावांमधील नोंद असलेल्या व नोंद नसलेल्या रस्त्यांची सरसकट मोजणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य शिव पाणंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते शरद पवळे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर तहसीलदार कार्यालयाने भूमी अभिलेख विभागाकडे कार्यवाहीसाठी पत्रव्यवहार केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अचूक, पारदर्शक आणि अक्षांश-रेखांशासह अधिकृत मोजणी नकाशा मिळण्याच्या दृष्टीने पारनेरचा हा उपक्रम महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
“ई-मोजणी 2.0 ही केवळ आधुनिक मोजणी प्रणाली न राहता शेतकरी व नागरिकांच्या हक्कांचा अचूक डिजिटल नकाशा उपलब्ध करून देणारे प्रभावी साधन ठरणार,पारनेरचा शिव पाणंद पॅटर्न राज्यातील शेतरस्त्यांच्या डिजिटल सीमासंरक्षणासाठी दिशादर्शक ठरेल.”
चौकट | शिव पाणंदच्या ५१ शेतरस्त्यांतून ग्रामविकासाचे नवे पर्व!
पारनेर तालुक्यात ५१ शेत-पाणंद रस्त्यांना मंजुरी
मुख्यमंत्री बळीराजा शेत-पाणंद रस्ते योजनेअंतर्गत पारनेर तालुक्यातील ५१ शेत-पाणंद रस्त्यांना मंजुरी मिळाली आहे. क्षेत्रीय समितीचे अध्यक्ष आमदार काशिनाथ दाते यांच्या अध्यक्षतेखाली रस्त्यांची निवड करण्यात आली.
मंजूर रस्त्यांची ई-मोजणी ऑनलाइन पद्धतीने प्राधान्याने पूर्ण करण्याचे निर्देश तहसीलदार कार्यालयाने संबंधित महसूल अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे मंजूर ५१ रस्त्यांचे मजबुतीकरण होणार.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button