वाई :-मा. मदनदादांनी केला. पीएच.डी.बद्दल सत्कार प्रा. भिमाशंकर बिराजदार यांना शिवाजी विद्यापीठाची पीएच.डी.
प्रतिनिधी वैष्णवी शिंदे :-9146802009

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483
मा. मदनदादांनी केला. पीएच.डी.बद्दल सत्कार
प्रा. भिमाशंकर बिराजदार यांना शिवाजी विद्यापीठाची पीएच. डी.
वाई: दि. २० भिमाशंकर बिराजदार यांना शिवाजी विद्यापीठाची इतिहास विषयात पीएच.डी. ही पदवी नुकतीच प्रदान करण्यात आली आहे. त्यांनी ‘एनव्हायरमेंटल अँड इकॉलॉजीकल मुव्हमेंट्स इन महाराष्ट्र (१९६०-२०१०)’ या विषयावर संशोधन करून शोधप्रबंध शिवाजी विद्यापीठाला सादर केला होता. त्यांना डॉ. अवनीश पाटील, सहाय्यक प्राध्यापक व विभागप्रमुख, इतिहास अधिविभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांचे मार्गदर्शन लाभले.
भिमाशंकर बिराजदार हे मूळचे अक्कलकोट तालुक्यातील कोन्हाळीसारख्या ग्रामीण भागातील असून शालेय शिक्षण गावात पूर्ण केले आहे. त्यानंतर सिद्धेश्वर देवस्थान संचलित विद्यार्थी वसतिगृहामध्ये राहून महाविद्यालयीन उच्च शिक्षण दयानंद कला व वाणिज्य महाविद्यालय, सोलापूर येथून पूर्ण केले आहे. त्यांनी एम.ए.इतिहास पदवी परीक्षेत (२००६) विशेष प्राविण्यासह पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सोलापूर विद्यापीठ गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांक मिळविला होता. सध्या ते जनता शिक्षण संस्थेचे किसन वीर महाविद्यालय, वाई जि. सातारा येथील वरिष्ठ महाविद्यालयात सहायक प्राध्यापक व इतिहास विभागप्रमुख म्हणून कार्यरत आहेत.
त्यांचे जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. मदनदादा भोसले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी सचिव डॉ. जयवंत चौधरी, खजिनदार प्रा. नारायण चौधरी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे, कार्यालय प्रमुख श्री. रघुनाथ शेलार, श्री. नंदकुमार भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती. या यशाबद्दल कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व सेवक यांनी त्यांचे अभिनंदन केले.