कृषी व व्यापारताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कराड:-सह्याद्री व कृष्णा साखर कारखाना यांनी मागील एफ आर पी लवकर जमा करा. अन्यथा आंदोलन करणार – सचिन नलवडे.

प्रतिनिधी नितीन कुलकर्णी :-9307293406

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483.

हेडिंग

सह्याद्री व कृष्णा साखर कारखाना यांनी मागील एफ आर पी लवकर जमा करा. अन्यथा आंदोलन करणार – सचिन नलवडे.

कराड

सह्याद्री व कृष्णा सहकारी साखर कारखान्यांनी गेल्या गळीत हंगामातील उसाची थकित एफ.आर.पी. शेतकऱ्यांना येत्या पंधरा दिवसात द्यावी अन्यथा रयत क्रांति संघटनेच्या वतीने दोन्ही कारखान्यांवरती तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा आज सचिन नलवडे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. रयत क्रांति संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सचिन नलवडे, जेष्ठ नेते सुदाम चव्हाण, तालुकाध्यक्ष शिवाजी पाटिल, योगेश झाम्बरे व शेतकऱ्यांच्या उपस्थितीत आज प्रांताधिकारी उत्तम दिघे यांना निवेदन देण्यात आले.

गेल्या वर्षीचा गळीत हंगाम पूर्ण होवून पाच महीने झाले तरी शेतकऱ्यांना अद्यापही पूर्ण एफ.आर.पी. ची रक्कम दोन्ही कारखान्यांनी दिलेली नाही. महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना चालू वर्षीच्या रिकवरी नुसार एफआरपी देण्याचा निर्णय घेतल्याने काही कारखान्यांच्या एफआरपी मध्ये मोठा फरक पडलेला आहे, तरी सर्व साखर कारखान्यांनी मागील वर्षीच्या साखर उताऱ्यानुसार शेतकऱ्यांना वाढीव दर देण्याची मागणी ही निवेदनात करण्यात आली आहे.

तसेच एथेनॉल, विज निर्मिती, मळी व इतर उप पदार्थातून मिळणाऱ्या उत्पन्नातून एफआरपी पेक्षा अधिकचा दर शेतकऱ्यांना देता येतो, तो साखर कारखान्यांनी द्यावा. तसेच चालू वर्षीच्या रिकवरी नुसार दर देणाऱ्या साखर कारखान्यांचा मागील आर्थिक अहवाल साखर आयुक्तांनी तपासावा व जास्तीच्या एफआरपी चा फरक शेतकऱ्यांना द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button