आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कराड :-कु. आदिती जाधवचे MHT-CET परिक्षेत घवघवीत यश.

प्रतिनिधी संतोष बोंगाळे कराड:-9923900840

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483.

कु. आदिती जाधवचे MHT-CET परिक्षेत घवघवीत यश.

कराड : (दि. 20, प्रतिनिधी) यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स, कराडची विद्यार्थिनी कु. आदिती धनाजी जाधव हिने MHT-CET परिक्षेत 99.43 टक्के गुण प्राप्त करून घवघवीत यश संपादन केले. मु. पो. खोडशी ता कराड येथील ग्रामीण भागातील एका मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या कु. आदिती जाधव हिने अत्यंत प्रतिकुल परिस्थितीवर मात करत, अभ्यासात सातत्य ठेवून हे उज्ज्वल असे यश संपादन केले आहे. घरातील आई वडील भाऊ यांचे तिला अभ्यासासाठी प्रोत्साहन मिळाले.
या उज्ज्वल यशाबद्दल यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स, कराडचे प्राचार्य डॉ एस. बी. केंगार, महाविद्यालयातील प्राध्यापक तसेच सह्याद्री साखर कारखाना, कराडचे माननीय संचालक पांडुरंग चव्हाण साहेब यांनी कु. अदिती जाधव हिचे कौतुक व सत्कार करून विशेष अभिनंदन केले. सर्वच स्तरातून कु. आदिती जाधव हिच्या या यशाबद्दल कौतुक व अभिनंदन होत आहे.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button