महाबळेश्वर तालुक्यात ७० वा धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि भीम क्रांती युवक संघटनेचा वर्धापन दिन उत्साहात संपन्न!
पत्रकार उत्तम भालेराव महाबळेश्वर तालुका अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

महाबळेश्वर तालुक्यात ७० वा धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि भीम क्रांती युवक संघटनेचा वर्धापन दिन उत्साहात संपन्न!

महाबळेश्वर: प्रतिनिधी उत्तम भालेराव
दि.२०/१०/२०२६
तालुका महाबळेश्वर येथे ७० वा धम्मचक्र प्रवर्तन दिन व भीम क्रांती युवक संघटनेचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात आणि चैतन्यमय वातावरणात साजरा करण्यात आला. भारतीय बौद्ध महासभा, भीम क्रांती युवक संघटना, वंचित बहुजन आघाडी आणि समता सैनिक दल यांच्या संयुक्त विद्यमाने या प्रेरणादायी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष नितीनजी गायकवाड, भीम क्रांती युवक संघटनेचे अध्यक्ष संतोष भालेराव, वंचित बहुजन आघाडीचे तालुक्याध्यक्ष तथा महाबळेश्वर प्रतिनिधी उत्तम भालेराव, महाबळेश्वर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हर्षद गालींदे व महाबळेश्वर तालुक्यातील तमाम समाजबांधवांनी त्रिशरण व पंचशीलाचा स्वीकार करून महामानवाला अभिवादन करण्यात आले. यानंतर समता सैनिक दलाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास मानवंदना दिली.
मुख्य बाजारपेठेतून रॅली व अशोक विजयादशमीचा जयघोष
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अभिवादनानंतर महाबळेश्वरच्या मुख्य बाजारपेठेतून एका भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले. ही रॅली ‘आराम चौक’ येथे पोहोचल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर मुक्काम भीम नगर, दीक्षा नगर येथे भीम क्रांती युवक संघटनेचा वर्धापन दिन आणि वर्षावास मालिकेचा सांगता समारंभ अत्यंत उत्साहात पार पडला.
या विशेष प्रसंगी महाबळेश्वर तालुक्यातील ज्या-ज्या गावांमध्ये वर्षावास (धम्मचर्चा व बौद्ध धर्मप्रसार) करण्यात आला होता, त्या सर्व गावांचा भीम क्रांती युवक संघटनेच्या वतीने सम्राट अशोक यांची प्रतिमा देऊन गौरव करण्यात आला.
मान्यवरांची विशेष उपस्थिती
या सोहळ्यासाठी भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्ह्याचे अध्यक्ष तथा भीम क्रांती युवक संघटनेचे संस्थापक अशोक भालेराव, जिल्हा हिजोब तपासणी दिलीप यादव यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी, माता-भगिनी आणि मोठ्या संख्येने बौद्ध बांधव उपस्थित होते. उपस्थित सर्व समाजबांधवांचा यावेळी पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
विशेष નોંધ: हा दिवस केवळ उत्सवाचा नसून, प्रज्ञा, शील, करुणेचा संदेश देणाऱ्या ‘अशोका विजयादशमी’ चा पवित्र दिन आहे. आजच्या दिवशी आपल्या संस्कृतीची, बौद्धांच्या गौरवशाली इतिहासाची आणि समतेच्या विचारांची मशाल अशीच तेवत ठेवण्याचा संकल्प महाबळेश्वरच्या या भूमीत उपस्थितांनी केला.
– उत्तम भालेराव, महाबळेश्वर प्रतिनिधी




