ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनची धडाकेबाज कामगिरी – मौजे साखरवाडी तालुका फलटण येथे छापा मारून एकूण 61500 ₹ किमतीचा गांजा केला जप्त.

प्रतिनिधी:- समीरखान पठाण फलटण :-9766685375

फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन ची धडाकेबाज कामगिरी …मोजे साखरवाडी ता. फलटण येथे छापा मारून एकुण 61,500 रूपये किंमतीचा गांजा केला जप्त

फलटण ग्रामीण /समीर पठाण

फलटण ग्रामीण पोलीसानी साखरवाडी येथे छापा टाकून अवैध गांजा विक्री करणाऱ्या चंदाबाई बाळू जाधव या संशयित महिलेस 61 हजार 500 रुपये किमतीच्या गांजा सहित अटक केली आहे.याबाबत सविस्तर वृत्त असे की, मौजे साखरवाडी येथे चंदाबाई बाळु जाथव हि गांजा विक्री करत असलेची खात्रीशिर बातमी मिळालेने त्यांनी महिला पोलीस उपनिरीक्षक थोंगडे , सहा . पोलीस फौजदार विलास यादव , पो . हवा . मोहन हांगे, रूपाली भिसे, निखील गायकवाड, गणेश अवघडे यांचे एक पथक तयार करून पोलीस पथकाने वेषांतर करून साखरवाडी भागात जावुन गोपनिय माहिती घेवुन आंबेडकरनगर साखरवाडी येथील चंदाबाई बाळु जाधव ही तीचे राहते घराचे आडोशाला बेकायदेशिर चोरटी गांज्याची विक्री करीत असल्याचे निदर्शनास आल्याने तिला अटक करून तिच्यावर भा द वि ५१०/२०२२ गुंगीकारक औषधद्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ ( एन.डी.पी.एस ) अधिनियम १ ९ ८५ चे कलम २० ( ब ) प्रमाणे गुन्हा दाखल करणेत आला आहे . गुपचुप चालणारा गांजा विक्रीचा धंदयावर बंद झाले आहेत . तरी कोणात्याही वेक्तीस अवैध्य धंदयाबाबत माहिती मिळताच संपर्क क्र .८ ९७५२६८२२००२१६६- २२२५३३ वर माहिती दयावी . माहिती देणा याचे नाव गोपनिय ठेवणेत येईल असे आवाहन फलटण ग्रामीण पोलिसांकडून करण्यात आले आहे.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button