आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वाई:-किसन वीर महाविद्यालयात बी. कॉम भाग ३ च्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ संपन्न.

पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला संघटक 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला संघटक

RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )

वाई दि. 02
किसन वीर महाविद्यालयात बी. कॉम भाग ३ च्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ संपन्न.

वाई दि २, येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयामध्ये बी. कॉम भाग ३ च्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ संपन्न झाला. जनता शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. जयवंत चौधरी कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ते म्हणाले की, माहिती तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांनी स्वतःला सिद्ध करण्यासाठी स्वतःचे ध्येय ठरविले पाहिजे, तसेच नवनवीन व्यावसायिक, मानवी व तांत्रिक कौशल्ये आवश्यक असून ती विद्यार्थ्यांनी आत्मसात केली पाहिजेत. तसेच तरुणांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून ध्येय साध्य करावीत.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे होते ते म्हणाले योग्य संधी विचारात घेऊन मेहनतीच्या जोरावर जिद्द असेल तर कोणतीही अशक्यप्राय गोष्ट सहजरित्या साध्य करता येते. वाणिज्य शाखेचे उप-प्राचार्य श्री भिमराव पटकुरे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात सुरू केलेल्या विविध कौशल्याआधारित अभ्यासक्रमांचा फायदा घ्यावा.
या कार्यक्रमामध्ये वाणिज्य व व्यवस्थापन विभागातील श्रीमती दिपाली चव्हाण, श्री. संदीप पातूगडे, श्री. जयवंत पवार यांनी आपले मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत कु. अर्पिता जाधव हिने केले, सूत्रसंचालन कु. वैशाली मांढरे हिने केले. कु. गायत्री पोळ हिने उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमास महाविद्यालयातील वाणिज्य व व्यवस्थापन विभागातील तसेच महाविद्यालयातील इतर विभागातील प्राध्यापक व वाणिज्य शाखेतील विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. सदिच्छा समारंभानंतर बी.कॉम भाग 3 च्या विद्यार्थ्यांनी जनता शिक्षण संस्थेचे सचिव, प्राचार्य व शिक्षकांचे उपस्थितीत वृक्षारोपण केले.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button