आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वाई:-किसन वीर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची दि न्यू इन्डिया एश्योरन्स कंपनी लिमिटेड, वाई शाखेस भेट.

पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला संघटक 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला संघटक

RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )

वाई दि.02
किसन वीर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची
दि न्यू इन्डिया एश्योरन्स कंपनी लिमिटेड, वाई शाखेस भेट.

किसन वीर महाविद्यालयातील वाणिज्य व व्यवस्थापन विभागाच्यावतीने बी. कॉम. भाग १ मधील “विमाकौशल्य” हा विषय असलेल्या विद्यार्थ्यांसाठी दि न्यू इन्डिया एश्योरन्स कंपनी लिमिटेड शाखा वाई या ठिकाणी अभ्यास भेट आयोजित करण्यात आली होती.
बदलत्या शैक्षणिक धोरणानुसार आणि सध्याच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञानावर अवलंबून न राहता त्यांना प्रात्यक्षिक ज्ञानाची ओळख व्हावी, या हेतूने ही अभ्यास भेट आयोजित करण्यात आली होती.
दि न्यू इन्डिया एश्योरन्स कंपनी लिमिटेड, वाई शाखा प्रबंधक श्रीमती अमरजीत कौर यांनी विद्यार्थ्यांना सर्वसाधारण विमा म्हणजे काय या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच व्यवसाय विकास अधिकारी श्री. प्रकाश वेदपाठक यांनी विद्यार्थ्यांना सर्वसाधारण विमा उतरविण्याची कार्यपद्धती, विम्याचा कालावधी, दावा प्रपत्र तयार करणे, सर्वसाधारण विमा पॉलिसीचे विविध प्रकार व फायदे इत्यादि अनेक गोष्टींवर मार्गदर्शन केले. विमा हप्त्याची गणना कशी केली जाते, दावा करण्यासाठी आवश्यक असणारे कागदपत्र याविषयी त्यांनी विद्यार्थ्यांना माहिती सांगितली. आजच्या काळातील सर्वसाधारण विम्याचे महत्व, त्यांनी विद्यार्थ्यांना पटवून दिले.
प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन रेखा भोसले यांनी केले. आभार श्रुती यादव यांनी मानले.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button