श्रीरामपूर:-महांकाळ वाडगावात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पथसंचलन उत्साहात संपन्न.
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

श्रीरामपूर:-महांकाळ वाडगावात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पथसंचलन उत्साहात संपन्न.

महांकाळ वाडगाव ( RpS स्टार न्युज प्रतिनिधी ) विजयादशमी निमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघ उंदिरगाव मंडळाच्या वतीने /सोमवार दि १९ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता पथसंचलनाचे आयोजन करण्यात आले होते . गावातील मारुती मंदिर व बरड वस्ती परिसरात हे पथसंचलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले यावेळी स्वयंसेवकांसह ग्रामस्थांची उपस्थिती होती संघाची स्थापना संघाचा प्रवास आणि समाजातील संघाच्या कार्यविषयी सविस्तर मार्गदर्शन केले यावेळी श्रीरामपुर तालुका संघ चालक अरविंद शहाणे उपस्थित होते गावातील ह भ प श्रद्धानंद महाराज यांनीही आपल्या मनोगतनातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यविषयी विचार व्यक्त केले विजया दशमीच्या निमित्ताने आयोजित या पथसंचलनातून शिस्त एकता राष्ट्रभक्ती आणि सामाजिक बंधिलकीचा संदेश देण्यात आला . स्वयंसेवकांच्या सहभागामुळे कार्यक्रमाला उत्साहपूर्ण वातावरण लाभले प्रमोद शेजुळ , झुराळे यांच्या सह गावातील स्वयंसेवक दत्तू चोरमल , विशाल जाधव , संजय मापारी ‘ संकेत पवार , सोपान पवार , बाबासाहेब दातीर , रामराव बडाख ‘ राम पवार , ऋषी बडाख ‘ मयुर खुरुद , स्वप्नील खुरुद ‘ ज्ञानेश्वर खुरुद ‘ प्रशांत खुरूद ‘ शिवा कुलथे , अजित पवार , लक्ष्मण सांगळे , वाल्मीक मापारी , अतुल बडाख , विशाल चोरमळ , राहुल पवार ‘ प्रमोद पवार ‘ जगदींष घोगरे ‘ सतीष चोरमळ , यांच्यासह समस्त ग्राम स्थांनी विशेष परिश्रम घेतले एकुनच विजयादशमीच्या पावन पर्वावर महाकाळवाडगात ‘ पार पडलेल्या या पथसंचलनातून संघकार्य ‘ सामाजिक एकोपा आणि राष्ट्रसेवेचा संदेश ग्रामस्थांपर्यंत पोहोचला




