नवी दिल्ली:-प्राचार्य डॉ. विठ्ठल बांदल यांना राष्ट्रीय तंत्र शिक्षक पुरस्काराने सन्मानित सोहळा.
प्रतिनिधी वैष्णवी शिंदे पुणे:-9146802009

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
नवी दिल्ली : अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद यांच्यावतीने पुणे येथील शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ- विठ्ठल बांदल यांना राष्ट्रीय तंत्र शिक्षक पुरस्काराने केंद्रीय शिक्षण व कौशल्य विकास मंत्री मा- धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आहे-
डॉ- बांदल हे मूळचे सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील बामणोली गावचे आहेत. लहानपणी अपघातात एक पाय निकामी होऊनही त्यांनी जिद्द बाळगून बामणोली, कुडाळ येथे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घेतले. इ. ११ वी., १२ वी. साठी वाईच्या जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयात प्रवेश घेऊन तेथील वसतिगृहात राहून शिक्षण घेतले. या दोन्ही वर्गात सर्वोच्च गुण मिळवून पुढे बी. एस्सी. भाग-१ शिवाजी विद्यापीठात प्रथम क्रमांक पटकावला. पुढे कराड येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून इलेक्ट्रिकल विषयात एम. ई. ची पदवी घेतली तर आय. आय. टी., पवई येथून पीएच. डी. ची पदवी प्राप्त केली. अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये ते सहभागी झाले. कराड येथील पॉलिटेक्निक कॉलेजचे विद्यार्थीप्रिय शिक्षक व प्राचार्य म्हणून जबाबदारी पार पाडलेले डॉ. बांदल सध्या पुणे येथील शासकीय पॉलिटेक्निक कॉलेजचे प्राचार्य म्हणून काम पाहत आहेत.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण घेत यशस्वी होत राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त करणारा हा प्रवास अनेकांना प्रेरणादायी ठरावा असाच आहे. या यशाबद्दल त्यांचे जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. मदन भोसले यांनी अभिनंदन करून महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असलेले डॉ. बांदल यांनी या कर्तबगारीने संस्थेचे व किसन वीर महाविद्यालयाचे नाव उज्वल केल्याचे सांगितले.