सोलापूर:-WOW संघटनेचे महिला भगिनींसाठी ‘एकल महिला धोरण’ अंतर्गत नाव नोंदणी आणि मार्गदर्शन शिबिराचे आयोजन.
पत्रकार संगीता फाळके

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

सोलापूर:-WOW संघटनेचे महिला भगिनींसाठी ‘एकल महिला धोरण’ अंतर्गत नाव नोंदणी आणि मार्गदर्शन शिबिराचे आयोजन.

सोलापूर :- कुमठा नाका येथे सदर नोंदणी शिबीर सोलापूर महानगर पालिकेच्या UCD विभागच्या सहकार्याने आयोजित करण्यात आले होते.
या शिबिराला आसपासच्या प्रभागातील वंचित एकल महिला भगिनींचा चांगला आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जवळजवळ 200 महिलांनी उपस्थित राहून या महत्त्वपूर्ण योजनेसाठी आपले फॉर्म भरले आणि नाव नोंदणी केली.यावेळी मनपाचे वसीम शेख यांचे सहकार्य लाभले.
महिलांना स्वावलंबी आणि सशक्त बनवणे, हेच आमचे मुख्य ध्येय आहे.या शिबिराच्या माध्यमातून अनेक गरजू महिलांना सरकारी योजनांचा लाभ घेण्यास मदत होईल.महिलांच्या या भक्कम पाठिंब्याबद्दल सर्वांचे संयोजिका आणि WoW संघटनेच्या अध्यक्षा विद्या लोलगे हे शिबीर आयोजित केले होते. यावेळी अफ्रिन ताई पटेल, वैशाली देशपांडे, शहाना कुरेशी,शोभा गायकवाड, मार्था आसादे, नम्रता जाधव — आदी उपस्थित होते.आपण सदैव त्यांच्या सेवेत तत्पर राहीलअसं विद्या लोळगे यांनी सांगितले.




