भुईंज पोलिसांनी डी.पी.चोरांना केले जेरबंद, आरोपीकडून जप्त केल्या 200 किलो वजनाच्या तांब्याच्या तारा.
पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला संघटक

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

दि.03
भुईंज पोलिसांनी डी.पी. चोरांना केले जेरबंद, आरोपीकडून जप्त केल्या 200 किलो वजनाच्या तांब्याच्या तारा.

भुईंज पोलीस ठाणे हद्दीतून दिनांक 03/07/2026 रोजी रात्री 10.00 ते दिनांक 04/07/2026 रोजी सकाळी 08.00 वाजण्याच्या दरम्यान मौजे पाचवड तालुका वाई गावचे हद्दीतून बबन गायकवाड यांच्या गट नंबर 380 मधील 63 kV A क्षमतेच्या ट्रांसफार्मर मधील सुमारे 70 किलो तांब्याची तार कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरी केली म्हणून वगैरे मजकुराचे खबरी वरून वैभव रोहिदास भोसले वय 43 वर्ष व्यवसाय लाईनमन यांनी पोलीस ठाणे तक्रार दिले वरून पोलिस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक 222/2026 बी एम एस कलम 303(2), 324(4),सह भारतीय विद्युत अदी.136 प्रमाणे दिनांक-06/07/2026 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच दरम्यान दिनांक 03/07/2026रोजी रात्री 11.00ते दिनांक 04/07/2026 रोजी सकाळी 09.00 वाचे दरम्यान मौजे केंजळ तालुका वाई येथील माळ नावाचे शिवारातून 110kva क्षमतेच्या ट्रांसफार्मर मधून सुमारे 55 किलो तांब्याची तार कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरी केली होती तसेच दिनांक 07/07/2026 रोजी रात्री 10.00 ते दिनांक 08/07/2026 रोजी सकाळी 09.00 वा चे दरम्यान मौजे खोलवडी तालुका वाई गावचे हद्दीतून धोम कॅनॉल लगत असलेल्या 110 kva क्षमतेच्या ट्रान्सफॉर्मर मधून सुमारे 55 किलो तांब्याची तार कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरी केली होती यावरून भुईंज पोलीस ठाण्यात वरील प्रमाणे तक्रार दाखल करण्यात आली होती
माननीय निखिल पिंगळे पोलीस अधीक्षक सो सातारा, माननीय श्रीमती वैशाली कडुकर अप्पर पोलीस अधीक्षक सो सातारा तसेच माननीय सुनील साळुंखे उपविभागीय पोलिस अधिकारी सो वाई विभाग वाई यांनी भुईंज पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी श्रीमती पुनम झगडे परी पोलीस उपाधीक्षक व पी वाय ताटे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या दरम्यान भुईंज पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक 270/2026 बी एम एस कलम 132,121(2),118(1),352,3(5) प्रमाणे दाखल गुन्ह्यातील आरोपी मुक्या उर्फ अमोल विनोद भोसले हा सदर गुन्ह्यामध्ये अटकेत असताना त्यास श्रीमती पुनम झगडे परी पोलीस उपाधीक्षक व पी वाय ताटे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी विश्वासात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने भुईंज पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक 222/2026 हा गुन्हा त्याचे इतर साथीदार विनोद भोसले व चक दे भोसले यांचेसोबत वरील ठिकाणी असलेल्या डीपी मधील तांब्याच्या तारा चोरी केल्या असल्याची कबुली दिली
सदर कारवाई माननीय निखिल पिंगळे पोलीस अधीक्षक सो सातारा, माननीय श्रीमती वैशाली कडूकर अप्पर पोलीस अधीक्षक सो सातारा व सुनील साळुंखे उपविभागीय पोलीस अधिकारी वाई विभाग वाई यांचे मार्गदर्शनाखाली भुईंज पोलीस ठाण्याच्या प्रभारी श्रीमती पुनम झगडे परी पोलीस उपाधीक्षक व पृथ्वीराज ताटे सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक सुरज शिंदे आकाश मोरे पोलीस हवालदार नितीन जाधव, अमोल सपकाळ आप्पा कोलवडकर पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ बल्लाळ सागर मोहिते यांनी पार पाडली.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.
ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION



