आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राहुरी:-महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेची ३४९ वी बैठक संपन्न!

पत्रकार राधाजी व्यवहारे श्रीगोंदा तालुका प्रतिनिधी

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

राहुरी:-महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेची ३४९ वी बैठक संपन्न!

राहुरी, अहिल्यानगर

अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेची ३४९ वी बैठक दिनांक २१ नोव्हेंबर २०२६ रोजी *श्रीगोंदा-नगर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय व कार्यक्षम आमदार श्री. विक्रमदादा बबनराव पाचपुते* व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाली.

या बैठकीत विद्यापीठाच्या शैक्षणिक, संशोधन, आर्थिक, प्रशासकीय तसेच पायाभूत सुविधांशी संबंधित विविध महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. विद्यापीठाच्या आगामी विकासाची दिशा, शैक्षणिक विस्तार आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञानाच्या अंमलबजावणीसंदर्भातील विविध प्रस्तावांचा आढावा घेण्यात आला.

यामध्ये प्रामुख्याने कृषी महाविद्यालयांच्या तुकडीवाढीचे प्रस्ताव, तपासणी व पुनर्मान्यता अहवाल, नवीन शैक्षणिक उपक्रम, कृषी क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्तेवरील (AI) प्रशिक्षण कार्यक्रम, अजितदादा पवार देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रासाठी स्वतंत्र ७० पदांची निर्मिती, तसेच विविध संशोधन केंद्रांमधील सुविधा व पायाभूत विकासकामांबाबत महत्त्वपूर्ण विचारविनिमय करण्यात आला.

याशिवाय विद्यापीठाचे नाव ‘महात्मा जोतीराव फुले कृषी विद्यापीठ’ करण्याचा प्रस्ताव, विद्यार्थ्यांसाठी प्रात्यक्षिक प्रशिक्षणाच्या संधी, डिजिटल सुविधा आणि विद्यापीठाच्या आर्थिक नियोजनासंदर्भातील विषयांवरही चर्चा करण्यात आली.

या बैठकीस आमदार श्री. किशोर दराडे, आमदार श्री. सत्यजित तांबे, आमदार श्री. हेमंत ओगले, डॉ. अशोक एस. ढवन, श्री. दत्तात्रय उगले आणि श्री. शशिकांत तरंगे उपस्थित होते. तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी ऑनलाइन माध्यमातून सहभागी झाले होते.

कृषी शिक्षणाचा दर्जा उंचावणे, संशोधनाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणे, विद्यार्थ्यांना कौशल्याधारित प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे आणि कृषी क्षेत्राच्या बदलत्या गरजांनुसार विद्यापीठ अधिक सक्षम करणे, या दृष्टीने या बैठकीतील निर्णय व प्रस्ताव महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.

आधुनिक कृषी तंत्रज्ञान, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि संशोधनाच्या माध्यमातून शेतकरी, विद्यार्थी व कृषी क्षेत्राच्या सर्वांगीण प्रगतीला चालना देण्यासाठी ही बैठक निश्चितच महत्त्वपूर्ण ठरली!

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button