सातारा जिल्हा क्रिकेट असोसिएशन – १९ वर्षांखालील निवड चाचणी उत्साहात संपन्न!
पत्रकार शिरीष जाधव महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

सातारा जिल्हा क्रिकेट असोसिएशन – १९ वर्षांखालील निवड चाचणी उत्साहात संपन्न!

१०३ खेळाडूंचा उत्स्फूर्त सहभाग; महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निमंत्रित लीग स्पर्धेसाठी ३० खेळाडूंची होणार निवड!
सातारा | प्रतिनिधी
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निमंत्रित लीग स्पर्धेच्या निवडीसाठी सातारा जिल्ह्यातील १९ वर्षांखालील खेळाडूंची निवड चाचणी रविवार, दि. २२ नोव्हेंबर २०२६ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या निवड चाचणीला जिल्ह्यातील जवळपास १०३ खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत क्रिकेटप्रेमाचा आणि आपल्या कौशल्याचा प्रत्यय दिला.
या निवड चाचणीमध्ये फलंदाज, वेगवान गोलंदाज, फिरकी गोलंदाज तसेच यष्टीरक्षक अशा विविध प्रकारांतील खेळाडूंनी आपले कौशल्य दाखवले. सर्व खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत निवड समितीचे लक्ष वेधून घेतले.
या निवड चाचणीचे यशस्वी आयोजन सातारा जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव माननीय इर्शादजी बागवान, धनंजय जाधव, चेअरमन शेखर पवार, सुजित जाधव, किरण राजे भोसले आणि सोमनाथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
या निवड प्रक्रियेनंतर एकूण ३० खेळाडूंची निवड करण्यात येणार असून, निवड झालेल्या खेळाडूंमध्ये दोन दिवसीय सराव सामने आयोजित केले जातील. या सराव सामन्यांतील कामगिरीच्या आधारे अंतिम संघाची निवड करण्यात येणार असल्याची माहिती सातारा जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव माननीय इर्शादजी बागवान यांनी दिली.
यावेळी त्यांनी सहभागी खेळाडूंना मार्गदर्शन करून त्यांच्या पुढील क्रिकेट कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.
तरुण क्रिकेटपटूंना संधी देणारा हा उपक्रम सातारा जिल्ह्यातील क्रिकेटच्या उज्ज्वल भवितव्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे.



