कृषी व व्यापारग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

नागठाणे:-शेतकरी आंदोलनातील यशानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार श्री.राजू शेट्टी साहेब व श्री.राजू शेळके यांचा नागठाणे येथे भव्य सत्कार!

पत्रकार महेश मोहिते सातारा तालुका क्राईम रिपोर्टर

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

 नागठाणे:-शेतकरी आंदोलनातील यशानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार श्री.राजू शेट्टी साहेब व श्री.राजू शेळके यांचा नागठाणे येथे भव्य सत्कार!

नागठाणे : शेतकऱ्यांचे कैवारी खासदार श्री राजू शेट्टी साहेब यांच्या नेतृत्वाखाली नुकत्याच पार पडलेल्या शेतकरी आंदोलनाला यश मिळाल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष तथा नवनिर्वाचित वर्णे गट जिल्हा परिषद सदस्य श्री. राजू शेळके यांच्या नेतृत्वाखाली नागठाणे नगरीत दोन्ही नेत्यांचे जंगी स्वागत व भव्य सत्कार करण्यात आला.
यावेळी नागठाणे गावचे युवा नेतृत्व संघर्षयोद्धा नंदकुमार नलवडे नाना, पंचायत समिती सदस्य संतोष लक्ष्मण साळुंखे पाटील, सातारा जिल्हा वाहतूक संघटनेचे श्री शंकर साळुंखे,माजी उपसरपंच घनश्याम ताटे, सतीश गोरे,महेश ढाणे, चंद्रकांत भोसले, समीर साळुंखे,अमोल साळुंखे,जालिंदर साळुंखे,महेश जाधव,विकास साळुंखे,प्रसन्न मूल्य,अभिजीत नलवडे गणेशवाडी,जयवंत नलावडे आल्याचे व्यापारी,अरुण अलाटे,घाडगे सर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, पदाधिकारी, शेतकरी बांधव आणि नागठाणे पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी संघटितपणे लढा देणाऱ्या नेतृत्वाचा सन्मान करत उपस्थितांनी आनंद व्यक्त केला. या स्वागत सोहळ्यामुळे नागठाणे परिसरात शेतकरी एकजुटीचा उत्साह पाहायला मिळाला.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button