आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
उंदरखेल गावात महादेव मंदिराजवळ बिबट्याचे दर्शन; नागरिकांमध्ये सतर्कतेचे आवाहन!
पत्रकार अमजद शेख बीड जिल्हाध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

उंदरखेल गावात महादेव मंदिराजवळ बिबट्याचे दर्शन; नागरिकांमध्ये सतर्कतेचे आवाहन!

उंदरखेल (प्रतिनिधी): उंदरखेल गावातील महादेव मंदिराजवळ आज रात्री ठीक ७:३० वाजण्याच्या सुमारास बिबट्या दिसल्याची माहिती समोर आली आहे. तसेच गावाच्या शिवारातही बिबट्या दिसल्याचे सांगण्यात येत आहे.
या घटनेमुळे परिसरातील नागरिकांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. नागरिकांनी रात्रीच्या वेळी विनाकारण घराबाहेर पडू नये. आपल्या लहान मुलांना घराबाहेर खेळण्यासाठी पाठवू नये. तसेच पाळीव जनावरांचीही काळजी घ्यावी.
सरपंच सागर दहातोंडे यांचे आवाहन
उंदरखेल गावातील सर्व नागरिकांनी सतर्क राहावे, कोणत्याही परिस्थितीत बिबट्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू नये. बिबट्या दिसल्यास तात्काळ वनविभागाला माहिती द्यावी, असे आवाहन सरपंच सागर दहातोंडे यांनी केले आहे.
नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी आणि प्रशासनाला सहकार्य करावे.




