आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पारनेर:-जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रांजणगाव येथे दहीहंडी शिक्षक दिन माता पालक मेळावा उत्साहात साजरा.

पत्रकार राजकुमार इकडे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

 पारनेर:-जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रांजणगाव येथे दहीहंडी शिक्षक दिन माता पालक मेळावा उत्साहात साजरा.

पारनेर, सुपा (राजकुमार इकङे)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रांजणगाव येथे गोपाळकाला व शिक्षक दिनाचे औचित्य साधून दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळेस बहुसंख्येने माता पालक उपस्थित होत्या. त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या मनोरंजनाचे विविध कार्यक्रम सादर करून बालचमुनी मनोरा रचत दहीहंडी फोडली. त्यानंतर माता पालक संघाचे आयोजन करून मातापालक सभा घेण्यात आली. यावेळी शाळेतील मुख्याध्यापिका श्रीमती वंदना आसणे यांनी माता पालकांना विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे नियोजन करून सांगण्यात आले. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्रीमती प्राजक्ता चहाल यांनी आपल्या मनोगता मध्ये सर्व पालकांना विद्यार्थ्यांच्या प्रगतीकडे लक्ष देण्याचे सुचवण्यात आले. श्रीमती रूपाली गंधाडे यांनी सर्वांचे आभार मानून सभा संपवण्यात आली.
त्यानंतर विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनाचे औचित्य साधून बाल शिक्षकांनी विद्यार्थ्यांना ज्ञानाचे धडे दिले. अशा पद्धतीने मोठ्या उत्साहात शिक्षक दिन साजरा करण्यात आला.
या सर्व उपक्रमांमध्ये शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती वंदना असणे श्रीमती रूपाली गंधाडे व उपाध्यापक श्री पठारे संदीप अंगणवाडी सेविका संगीता ताई व यू के जी शिक्षिका मण्यार अलमिसबा यांनी मोठी मेहनत घेत सर्व कार्यक्रम यशस्वी रीत्या संपन्न केले.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button