पारनेर:-छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान ही आमची अस्मिता – गुन्हा मागे घ्या.
पत्रकार राजकुमार इकडे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

पारनेर:-छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान ही आमची अस्मिता – गुन्हा मागे घ्या.

अमित साहेब ठाकरे यांच्यावरील खोटा गुन्हा मागे घेण्यासाठी सुपा पोलीस स्टेशनला मनसेचे निवेदन.
सुपा/पारनेर (राजकुमार इकडे )
दि. २१/०९/२०२६ -पुणे येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात विद्यार्थ्यांना सडलेले अन्न दिले जात असल्याच्या तक्रारीवरून पाहणीसाठी गेलेल्या मनसे नेते मा. अमित साहेब ठाकरे यांच्यावर किरकोळ कारणावरून चतुःशृंगी पोलीस ठाण्यात खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा निषेध म्हणून आज पारनेर तालुका मनसेकडून *सुपा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा. ज्योतीताई गडकरी* यांना निवेदन देण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान ही आमची अस्मिता आहे. त्यासाठी कितीही गुन्हे दाखल झाले तरी आम्ही मागे हटणार नाही. हा गुन्हा मागे न घेतल्यास सुपा पोलीस स्टेशन समोर मनसे स्टाईलने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
मनसेच्या मागण्या – १) सडलेले अन्न पुरवणाऱ्या कॅन्टीन ठेकेदारावर कारवाई व्हावी, २) महापुरुषांच्या शेजारी फोटो लावणाऱ्या प्राचार्यावर कारवाई व्हावी, ३) अमित साहेबांवरील गुन्हा तात्काळ मागे घ्यावा.
हे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष तथा पारनेर तालुकाध्यक्ष *मा. अविनाश पवार* यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.
यावेळी सुपा शहर अध्यक्ष अक्षय सूर्यवंशी, पारनेर तालुका उपाध्यक्ष विरेंद्र थोरात, पारनेर शहर अध्यक्ष सतीश म्हस्के यांच्या सह महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




