लोणी काळभोर पोलीस स्टेशन हद्दीतील खुनाचा प्रयत्न करणाऱ्या व दीड वर्षापासून फरारी असणाऱ्या आरोपीस युनिट 6 गुन्हे शाखा यांनी घेतले ताब्यात.
पत्रकार अब्दुल रहीम शेख कात्रज शहराध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

लोणी काळभोर पोलीस स्टेशन हद्दीतील खुनाचा प्रयत्न करणाऱ्या व दीड वर्षापासून फरारी असणाऱ्या आरोपीस युनिट 6 गुन्हे शाखा यांनी घेतले ताब्यात.

रोजी आशिष जाधव पोलीस उपनिरीक्षक, सहाय्यक फौजदार ज्ञानेश्वर शिर्के, हवालदार नानासाहेब मोरे, पोलीस हवालदार अमित सस्ते, पोलीस अंमलदार अक्षय बांदल व पोलीस अंमलदार संतोष राठोड युनिट ६,गुन्हे शाखा , पुणे शहर असे मिळून लोणी काळभोर पोलीस स्टेशन हद्दीत गुन्ह्यातील पाहिजे आरोपींचा शोध घेत असताना, पोलीस अंमलदार अक्षय बांदल यांना,” गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, लोणी काळभोर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 103/2025, भारतीय न्याय संहिता कलम 109, 115(1), 117(2), 118(2), 299, 351(2), 3(5) तसेच भारतीय हत्यार कायदा कलम 4(25) अन्वये दाखल गुन्ह्यातील पाहिजे आरोपी साहिल आनंद सकट, वय 21 वर्षे, रा. घोरपडी वस्ती, इंदिरा नगर, लोणी काळभोर, पुणे, हा त्याच्या राहते घराजवळ असल्याची माहिती मिळाली त्यास उपलब्ध स्टाफ ताब्यात घेऊन त्याची वैद्यकीय तपासणी करून लोणी काळभोर पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात देत आहोत.
(संतोष शेटे )
पोलीस निरीक्षक
युनिट 6, गुन्हे शाखा , पुणे शहर




