कृषी व व्यापारग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

मायणी:-मोहिते मळा येथील साठवण बंधाऱ्यात अखेर उरमोडीचे पाणी.

ज्येष्ठ पत्रकार प्रा दिलीप पुस्तके सातारा

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

मोहिते मळा येथील साठवण बंधाऱ्यात अखेर उरमोडीचे पाणी.

मायणी प्रतिनिधी-

खटाव तालुक्यात दुष्काळाची तीव्रता वाढली असून अनेक साठवण बंधारे कोरडे टाक पडले आहे.मोहिते मळा येथील साठवण बंधारा देखील असाच कोरडा पडला आहे परंतु नामदार जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनानुसार व सौ सोनिया गोरे व दिलीपराव येळगावकर यांच्या नियोजनानुसार तसेच जिल्हा परिषद सदस्य सुरज

पाटील यांच्या खास प्रयत्नामुळे मोहिते मळा येथील साठवण बंधाऱ्यात आज सकाळी उरमोडी वाहिनी मधून पहिले आवर्तन सोडण्यात आले पाणी येताच शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसू लागला यावेळी जिल्हा परिषद सदस्य सुरज पाटील यांनी सांगितले की नियोजित पाईपलाईनचे जे काम आहे ते आपण विस्तारित रूपाने पूर्ण करू या प्रक्रियेसाठी आपले पाणीदार आमदार जयकुमार गोरे भाऊ यांच्याशी चर्चा करून विस्तारित उपनलिकेचा मार्ग मोकळा करू त्यामुळे एकही शेतकरी पाण्यापासून वंचित राहणार नाही तसेच तलावाखालील सर्व पाणी योजना आपण लवकरच कार्यान्वित करू असे आश्वासन दिले यावेळी विनोद मोहिते व ग्रामस्थ यांनी शेती पंप, पानंद रस्ते, या विषयावर चर्चा करण्यात आली या कार्यक्रमास विनोद मोहिते, संतोष मोहिते, कमलाकर मोहिते, सचिन निकम, प्रताप पवार, सूर्यकांत पवार, नानासो शेडगे , प्रसाद शेडगे, धनराज पवार, सागर मोहिते, पांडुरंग मोहिते, प्रल्हाद हुंडेकर, रोहित मोहिते, तुकाराम चव्हाण, बाळकृष्ण माने, प्रकाश सोरटे, व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते शेवटी दीपक पवार यांनी आभार मानले

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button