कराड येथे १० सप्टेंबरला जनता दरबाराचे आयोजन.
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

कराड येथे १० सप्टेंबरला जनता दरबाराचे आयोजन.

कराड : – भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. श्री. रविंद्रजी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मा. श्री. संतोषजी साखरे यांच्या उपस्थितीत दि. १० सप्टेंबर २०२६ रोजी कराड येथील शासकीय विश्रामगृहात जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे.
सर्वसामान्य नागरिक, भाजपा कार्यकर्ते तसेच पदाधिकारी यांच्या शासन स्तरावर प्रलंबित असलेल्या वैयक्तिक कामांबाबतच्या अडचणी व प्रश्न संबंधित शासकीय विभागांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी या जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे.
शासकीय कार्यालयांमध्ये विविध कारणांमुळे प्रलंबित असलेली वैयक्तिक कामे, नागरिकांच्या अडचणी तसेच प्रशासकीय स्तरावरील प्रश्न या जनता दरबाराच्या माध्यमातून मांडण्याची संधी नागरिकांना उपलब्ध होणार आहे. संबंधित प्रश्नांना योग्य व्यासपीठ मिळावे आणि प्रलंबित कामांना गती मिळावी, यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.
ज्या नागरिकांची शासकीय स्तरावर वैयक्तिक कामे प्रलंबित आहेत, त्यांनी आपल्या कामासंदर्भातील सविस्तर निवेदन मा. श्री. रविंद्रजी चव्हाण, प्रदेशाध्यक्ष, भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश यांच्या नावे तयार करून जनता दरबारात घेऊन यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
हा जनता दरबार दि. १० सप्टेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत कराड येथील शासकीय विश्रामगृहात होणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या प्रश्नांना व अडचणींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.




