पाचगणी:-सातारा जिल्हा बँक निवडणूक: रुपालीताई राजपुरे यांच्या उमेदवारीचा मार्ग सुकर.
पत्रकार अमोल चोरगे महाबळेश्वर तालुका उपाध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

पाचगणी:-सातारा जिल्हा बँक निवडणूक: रुपालीताई राजपुरे यांच्या उमेदवारीचा मार्ग सुकर.
सर्वोच्च न्यायालयाच्या दिलाशाने विरोधकांना चपराक! कार्यकर्त्यांनी फटाके फोडून केला आंनद व्यक्त.

पाचगणी: सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महाबळेश्वर सोसायटी मतदारसंघातून रुपालीताई राजेंद्रशेठ राजपुरे यांच्या उमेदवारीवरील आक्षेपा संदर्भातील प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयातून स्थगिती मिळाल्यामुळे रुपालीताईंच्या निवडणुकी लढवण्याचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला आहे. न्यायालयीन लढाईतील या यशस्वी टप्प्यानंतर, “राजेंद्रशेठ राजपुरे जरी संचालक पदाच्या बाहेर जात असले, तरी आता रुपालीताई जिल्हा बँकेत नक्की जाणार,” असा विश्वास व्यक्त करत कार्यकर्त्यांनी पाचगणीत जोरदार फटाके फोडून आणि पेढे वाटून जल्लोष केला. गेली १५ वर्षे संचालक म्हणून काम पाहणाऱ्या राजेंद्रशेठ राजपुरे यांना विरोधकांनी निवडणुकीबाहेर करण्याचा कितीही प्रयत्न केला असला, तरी रुपालीताईंच्या या जोरदार पुनरागमनाने विरोधकांच्या मनसुब्यांना मोठे पाणी फेरले असून त्यांना ही एक प्रकारे मोठी चपराक मानली जात आहे.




