महाबळेश्वर:-लोकहित सर्वोच्च! तापोळा–महाबळेश्वर १०५ गावांची जीवनवाहिनी अखेर सुरू; जनप्रतिनिधी, प्रशासन आणि नागरिकांच्या एकजुटीचा आदर्श.
पत्रकार उत्तम भालेराव महाबळेश्वर तालुका अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

महाबळेश्वर:-लोकहित सर्वोच्च! तापोळा–महाबळेश्वर १०५ गावांची जीवनवाहिनी अखेर सुरू; जनप्रतिनिधी, प्रशासन आणि नागरिकांच्या एकजुटीचा आदर्श.

अतिवृष्टीमुळे खचलेल्या तापोळा–महाबळेश्वर या १०५ गावांच्या प्रमुख जीवनवाहिनी मार्गावरील संकटावर अखेर मात करण्यात आली असून, छोट्या चारचाकी वाहनांसाठी मार्ग सुरू करण्यात आला आहे. ही केवळ रस्त्याची दुरुस्ती नसून, लोकहिताला सर्वोच्च प्राधान्य देत प्रशासन, जनप्रतिनिधी आणि नागरिकांनी संविधानातील लोककल्याणकारी मूल्यांचे जतन करत उभारलेला आदर्श आहे.
या कामासाठी जिल्हा परिषद सदस्य श्री. अजितदादा सकपाळ आणि महाबळेश्वर पंचायत समितीचे उपसभापती श्री. संजयभाई मोरे यांनी शासकीय निधीची वाट न पाहता स्वतःच्या खिशातून आर्थिक मदत करून कामाची तात्काळ सुरुवात केली. आपत्तीच्या काळात लोकांचे प्राण आणि संपर्क व्यवस्था महत्त्वाची मानून त्यांनी दाखवलेली तत्परता ही जनप्रतिनिधी म्हणून त्यांच्या लोकाभिमुख भूमिकेचे उदाहरण आहे.
तसेच महाबळेश्वर नगरपरिषदेचे नगरसेवक श्री. आबा शिंदे यांनी आवश्यक यंत्रसामग्रीचे प्रभावी नियोजन करून सकाळपासून रात्रीपर्यंत घटनास्थळी थांबत कामाचा पाठपुरावा केला. त्यांच्या समन्वयामुळे दुरुस्तीचे काम अधिक वेगाने पूर्ण होण्यास मोलाची मदत झाली.
या संपूर्ण कार्यात सातारा जिल्हा युवा सेना अध्यक्ष विशालभाऊ सकपाळ, महाबळेश्वर तालुकाप्रमुख गणेश उतेकर, संविधान प्रचारक उत्तम भालेराव, सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब मोरे, संपत जाधव, गणेश सपकाळ, राम सपकाळ, राजू सपकाळ, आनंददादा (खांबील), १०५ गाव नियोजन समितीचे सर्व कार्यकर्ते तसेच तहसील प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD), नगरपालिका, वन विभाग आणि संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा यांनी रात्रंदिवस अथक परिश्रम घेत नागरिकांचा संपर्क पूर्ववत करण्यासाठी उल्लेखनीय योगदान दिले.
याचबरोबर रस्त्यालगतच्या संबंधित प्रॉपर्टी मालकाने स्वतःच्या लाखो रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान सहन करून कोणताही अडथळा न आणता जनहितासाठी जागा उपलब्ध करून दिली. वैयक्तिक हितापेक्षा सार्वजनिक हित मोठे मानण्याची ही कृती समाजासाठी प्रेरणादायी आहे.
ही घटना सिद्ध करते की आपत्तीच्या काळात राजकारण नव्हे, तर लोककारण महत्त्वाचे असते. शासन, प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांचा समन्वय, पारदर्शकता आणि सामूहिक जबाबदारी यामुळेच १०५ गावांतील हजारो नागरिकांना दिलासा मिळाला.
१०५ गावांतील नागरिकांच्या वतीने या कार्यात योगदान देणाऱ्या सर्व जनप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते, स्वयंसेवक आणि जनहितासाठी स्वतःचे नुकसान सहन करणाऱ्या प्रॉपर्टी मालकांचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार. लोकसेवेचा हा आदर्श समाजासाठी प्रेरणादायी ठरेल.




