माळेवाडी:-उंदिरगावातील ८०० कुटुंबांना विमा संरक्षण; एलआयसी प्रतिनिधी राहुल वाघ यांचा गौरव.
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

माळेवाडी:-उंदिरगावातील ८०० कुटुंबांना विमा संरक्षण; एलआयसी प्रतिनिधी राहुल वाघ यांचा गौरव.

माळेवाडी (RPS स्टार न्यूज प्रतिनिधी) – श्रीरामपूर तालुक्यातील उंदिरगाव या छोट्याशा गावात गेल्या सहा वर्षांपासून एलआयसीच्या माध्यमातून सुमारे ८०० कुटुंबांना विमा संरक्षण देत कुटुंबांची आर्थिक सुरक्षितता वाढविण्याचे काम एलआयसी प्रतिनिधी श्री. राहुल बाळासाहेब वाघ सातत्याने करत आहेत.
प्रामाणिकपणा, स्वाभिमान आणि सातत्याने काम करत त्यांनी गावातील नागरिकांचा विश्वास संपादन केला आहे. त्यांच्या या कार्याची विशेष दखल घेत एलआयसी पुणे विभागीय कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कार्यालयात त्यांचा सत्कार करून गौरव केला.
या सन्मानाबद्दल बोलताना राहुल वाघ यांनी हा क्षण आपल्यासाठी अभिमानाचा असल्याचे सांगितले. तसेच, हा सन्मान केवळ आपला नसून आपल्यावर विश्वास ठेवून एलआयसीच्या पॉलिसी घेतलेल्या सर्व ग्राहकांचा असल्याचे त्यांनी नमूद केले.
गेल्या सहा वर्षांत विश्वास दाखविणाऱ्या सर्व ग्राहकांचे त्यांनी मनःपूर्वक आभार मानले. ग्रामीण भागातील कुटुंबांना विम्याचे महत्त्व समजावून सांगत त्यांना आर्थिक सुरक्षिततेशी जोडण्याचे काम पुढेही सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.




