आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अहिल्यानगर:-अनेक पुरस्कार प्राप्त ” सुभाष ढवळे “यांच्या वधूवर सूचक मंडळाच्या माध्यमातून दिड हजारावर विवाह संपन्न.

पत्रकार राजकुमार इकडे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

 अहिल्यानगर:-अनेक पुरस्कार प्राप्त ” सुभाष ढवळे “यांच्या वधूवर सूचक मंडळाच्या माध्यमातून दिड हजारावर विवाह संपन्न.

अहिल्यानगर (राजकुमार इकङे)सामाजिक कार्याचा विडा उचललल्या सुभाष ढवळे यांच्या सर्व जाती धर्मांच्या वधू वर सूचक मंडळाच्या माध्यमातून आतापर्यंत दिड हजारांवर विवाह जुळले असुन या त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना आजपर्यंत अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
अहिल्या नगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील हळगांव येथील परंतु सुरुवातीपासूनच सामाजिक कार्याची आवड असल्याने श्रीगोंदा येथे स्थायिक होऊन विवाह जुळविण्याचे काम करणारे सुभाष ढवळे यांनी आतापर्यंत पर्यंत दिड हजारांवर विवाह जुळवून दिले आहेत. विवाह इच्छुकांच्या रेशीम गाठी बांधणारे सुभाष ढवळे यांना या सामाजिक कार्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते अनेक पुरस्कारही मिळाले आहेत तसेच ठिकठिकाणी सत्कारीत करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गेल्या आठ ते दहा वर्षांपासून मुलांचे विवाह जुळणे अवघड होऊन बसले आहे. आज प्रत्येक गावात विवाह इच्छुक तरुणांची संख्या प्रचंड आहे. परंतु श्रीगोंदा येथील सामाजिक कार्यकर्ते सुभाष ढवळे यांनी विवाह मंडळाच्या माध्यमातून आतापर्यंत दिड हजारांवर विवाह जुळवून दिले आहेत. त्यांच्या या महत्त्वाच्या सामाजिक कार्याबद्दल आतापर्यंत अनेक सामाजिक कार्याचे पुरस्कार मिळाले आहेत.
श्रीगोंदा येथील व गोरगरिबांसाठी झटणारा खरा सामाजिक कार्यकर्ता सुभाष ढवळे यांनी सामाजिक बांधिलकी जपत आजपर्यंत सर्वधर्मीय मुला-मुलींचे १६०० शुभविवाह जमविले आहेत. दोन्हीही घरांचे मिलन माणुसकी जपण्याचे काम ढवळे वधु वर सूचक मंडळाच्या माध्यमातून ते करतात. श्री सुभाष ढवळे यांना प्रहार दिव्यांग संघटना अहिल्यानगर आणि जय मल्हार फाउंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. अहिल्यानगर येथे महाराष्ट्र राज्य यशवंत सेना सरसेनापतीचे संस्थापक अध्यक्ष माधव गडदे, अहिल्यानगर यशवंत सेना जिल्हा अध्यक्ष श्री विजय तमनर, आमदार संग्रामभैय्या जगताप यांचे बंधू श्री सचिनभैय्या जगताप, खासदार श्रीकांत शिंदे फाउंडेशन जिल्हाप्रमुख श्री राजेंद्र पोकळे या सर्व पदाधिकारी यांच्या हस्ते श्री सुभाष ढवळे यांना राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार प्रदान करण्यात आला.
श्री सुभाष ढवळे यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे विधान परिषदेचे सभापती ना. राम शिंदे, माजी मंत्री बबनराव पाचपुते, अहिल्यानगर शहराचे आमदार संग्रामभैय्या जगताप, श्रीगोंदाचे विधानसभा मतदारसंघाचे आमदार विक्रम पाचपुते, सांगली पंचायत समितीच्या माजी सदस्या अनिताताई कदम तसेच रयत शेतकरी संघटना सातारा जिल्हाध्यक्ष संजय लाड, जामखेड तालुक्यातील हळगावचे मा. उपसरपंच आबासाहेब ढवळे यांच्यासह महाराष्ट्रातील अनेकांनी सुभाष ढवळे यांचे अभिनंदन केले. त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेत विधानपरिषदेचे सभापती प्रा. ना. राम शिंदे यांनी एका लग्न सोहळ्यानिमित्त सुभाष ढवळे यांची भेट घेऊन विविध विषयावर चर्चा केली तसेच सुभाष ढवळे यांच्या सामाजिक कार्याबद्दल प्रा.ना. राम शिंदे यांनी तोंड भरून कौतुक केले. ढवळे वधू वर संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष सुभाष ढवळे यांच्या हस्ते मा. सभापती राम शिंदे यांचा विशेष सन्मान सत्कार करण्यात आला. ज्या पालकांच्या मुला मुलींचे विवाह जुळत नाहीत त्यांनी सुभाष ढवळे यांच्याशी संपर्क साधावा व आपल्या बायोडाटा त्यांच्या कडे पाठवावा अधिक माहितीसाठी 9371929304 या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन सुभाष ढवळे यांनी केले आहे.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button