माळेवाडी:-खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना शेतकरी संघटना स्वतंत्र भारत पक्ष कडून विविध मागण्यांचे निवेदन.
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

माळेवाडी:-खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना शेतकरी संघटना स्वतंत्र भारत पक्ष कडून विविध मागण्यांचे निवेदन.

माळेवाडी ( RpS स्टार न्युज प्रतिनिधी ) मतदार संघातील गोदावरी नदीवरील कोल्हापूर बांधारे पूर्ण क्षमतेने भरून देण्यात यावेत कारण आता पाऊस थांबल्याने नदी पाणी आवक नाही त्यामुळे नदीतील कोल्हापूर बंधारे कोरडेच आहेत त्यामध्ये पुन्हा पाणी सोडून बंधारे पूर्ण क्षमतेने भरून देण्यात आले तरच नदीकाठच्या हजारो शेतकऱ्यांवर येईल
गोदावरी नदीवरील प्रलंबित असलेल्या शनी देवगाव उच्च पातळी बंधाऱ्याचे रखडलेले काम त्वरित सुरू करावे , गेल्या वर्षभरापासून महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण चे मंजुरी अभावी रखडले आहे त्यास तत्काळ मान्यता मिळवून देऊन या बंधाऱ्याचे रखडलेले काम त्वरित सुरू करावे अशी मागणी केली
श्रीरामपुर – वैजापूर रोड , उंदिरगाव ( सरकारी ) दवाखाना मार्गे ) ते महांकाळ वाडगांव रस्ता काम करणे बाबत मागणी केली आहे हा रस्ता २०-२२ वर्ष पुर्वी पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून झाला होता पण आता २२ वर्षात हा रस्ता वाहतुकीसाठी पुर्णपने नादुरुस्त झाल्याने या रस्त्वा वरील उंदिरगाव , माळेवाडी , महांकाळ वाडगाव या गावातील शेतकऱ्यांना रस्त्या अभावी शेती करणे दुरापास्त झाले आहे त्यामुळे तातडीने खासदार निधीतून या रस्त्याचे डांबरीकरण चे काम कण्यात यावे अशी मागणी केली आहे
मतदार संघातील सर्व तानुक्यात दुष्काळ जाहीर करून शेतक्ऱ्यांना तातडीने मदत मिळवून द्यावी अशी मागणी केली आहे
या मागण्यांचा निवेदनावर शेतकरी संघटना स्वतंत्र भारत पक्ष अहिल्यानगरचे जिल्हा अध्यक्ष निलेश भाऊ शेडगे ‘ महिला आघाडी प्रमुख श्रीमती सुनीताताई वानखडे , मंदा गमे ‘ उपाध्यक्ष नवनाथ दिघे ‘ तालुका अध्यक्ष प्रकाश जाधव ‘ विष्णू भनगडे , अंबादास गमे ‘ श्रीराम त्रिवेदी , अर्जुन दातीर , मयूर भनगडे , बाळासाहेब घोगरे , बाळासाहेब गायकवाड , रमेश शिंगोटे , रमेश शिंदे , मधू काकड , आदी शेतकऱ्यांच्या सह्या आहेत .




