वाईच्या मांढरगडावर अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यालाच फाशी? अंधश्रद्धेला खतपाणी! सभोवतालच्या झाडांवर लिंबू,मिरची, खिळे,काळया बाहुल्यांचे साम्राज्य.?
पत्रकार नित्यानंद मोरे वाई शहर प्रतिनिधी

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

वाईच्या मांढरगडावर अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यालाच फाशी? अंधश्रद्धेला खतपाणी! सभोवतालच्या झाडांवर लिंबू,मिरची, खिळे,काळया बाहुल्यांचे साम्राज्य.?

सातारा वाई.
सातारा जिल्हातील वाई तालुक्यातील मांढरगडावर आई मांढरदेवीचे मंदिर हे देशातील अनेक भाविकांचे श्रध्दास्थान आहे.या ठिकाणी देशातील अनेक राज्यांतील भाविक मोठ्या श्रद्धेने आई मांढरदेवच्या दर्शनासाठी येत असतात.याच मांढरदेवीची यात्रा ही जानेवारी महिन्यात मोठ्या उत्साहाने भरते या जत्रेत देशातील, राज्यातील लाखों लोक भक्ती भावाने मांढरदेवीचे दर्शन घेण्यासाठी येत असतात तसेच अमावस्या, पौर्णिमा, मंगळवार, शुक्रवार इतर दिवशीही मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत असते मोठ्या प्रमाणात भाविक येत असल्याने येथील आर्थिक उलाढाल ही खूप मोठ्या प्रमाणात अनेक कोटींची होत असते.मात्र येथे श्रद्धेच्या नावाखाली येणारे अंधश्रद्धा पसरविण्याचे काम मोठ्या प्रमाणात करत असल्याचे चित्र समोर येत आहे.
मांढरदेव गडावर मांढरदेवीच्या मंदिरा सभोवती असणाऱ्या सर्व झाडांना मोठ्या प्रमाणात लिंबू, मिरची, लाल काळे धागे, खिळे ठोकलेल्या काळ्या बाहुल्यांचे साम्राज्य निदर्शनास येते आहे माझे चांगले कर आणि दुसऱ्याचे वाईट कर! याची शिक्षा झाडांना का?हा श्रद्धेचा कोणता प्रकार आहे. अंधश्रद्धा निर्मूलन कायदा आहे की नाही? या कायद्यालाच येथे फाशी देण्याचे काम येथे होत आहे.
यासाठी प्रशासन अधिकारी तसेच ट्रस्ट समिती सदस्य व अध्यक्ष यांचेच काम आहे यावर बंदी करण्याचे अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याचे!मात्र यांचेच याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे म्हणजेच मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत आहे देवाणघेवाण होत आहे असे म्हटले तर काही वावगे ठरणार नाही.अशा अंधश्रद्धा पसरविणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होणे गरजेचे आहे. अशी भावना अनेक भाविकांकडून व्यक्त केली जात आहेत.




