अहिल्यानगर:-चिंचविहिरे जि.प.प्राथमिक शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी अशोक (संदीप) नालकर; उपाध्यक्षपदी सोनाली साळवे यांची सर्वानुमते निवड.
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

चिंचविहिरे जि.प.प्राथमिक शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी अशोक (संदीप) नालकर; उपाध्यक्षपदी सोनाली साळवे यांची सर्वानुमते निवड.

🔹सभेमध्ये जुन्या कार्यकारिणीचा कृतज्ञतापूर्वक सत्कार; नूतन पदाधिकाऱ्यांचे गावकऱ्यांकडून अभिनंदन करण्यात आले.
चिंचविहिरे (प्रतिनिधी):
स्थानिक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंचविहिरे येथे शाळा व्यवस्थापन समितीच्या (SMC) पुनर्गठनासाठी विशेष पालक सभेचे आयोजन उत्साहात व शांततेच्या वातावरणात करण्यात आले. या सभेत शासनाच्या नियमांनुसार पारदर्शक कार्यवाही करत नवीन कार्यकारिणीची बिनविरोध निवड करण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी श्री. अशोक (संदीप) यादवराव नालकर तर उपाध्यक्षपदी सौ. सोनाली भारत साळवे यांची सर्वानुमते निवड जाहीर करण्यात आली.
शाळेच्या प्रांगणात आयोजित या पालक सभेस ग्रामस्थ व पालकांनी उत्स्फूर्त उपस्थिती दर्शवली. बैठकीच्या सुरुवातीला सभेचा मुख्य उद्देश व शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे वाचन करण्यात आले. त्यानंतर सर्व पालकांच्या सहमतीने शाळा व्यवस्थापन समितीच्या नूतन सदस्यांची निवड करण्यात आली.
*🔸नूतन कार्यकारिणी सदस्य:*
समितीच्या सदस्यपदी सौ. सोनाली प्रमोद तोरणे, श्री. रवींद्र बाळासाहेब नरोडे, सौ. मनीषा संजय नालकर, सौ. अर्चना सचिन साळवे, श्री. सतीश बर्डे, सौ. मेघा सचिन बर्डे, सौ. ममता शरद नरोडे, श्री. सचिन सोपान नालकर आणि श्री. राहुल शेलार यांची एकमुखाने निवड करण्यात आली.
*🔸माजी व नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार:*
सभेच्या उत्तरार्धात माजी अध्यक्ष श्री. मारुती नालकर व त्यांच्या कार्यकारिणीतील सर्व माजी सदस्यांनी शाळेच्या प्रगतीसाठी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांचा पुष्पगुच्छ देऊन कृतज्ञतापूर्वक सत्कार करण्यात आला. तसेच नवनिर्वाचित अध्यक्ष श्री. अशोक नालकर, उपाध्यक्षा सौ. सोनाली साळवे व सर्व नूतन सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.
🔸यावेळी बोलताना नूतन अध्यक्षांनी, “शाळेचा सर्वांगीण गुणवत्ता विकास, डिजिटल शिक्षण आणि पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणासाठी संपूर्ण समिती पालकांच्या साथीने कटिबद्ध राहील,” असा विश्वास व्यक्त केला.
सदर सभा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. या निवडीबद्दल चिंचविहिरे परिसरातील ग्रामस्थ, शिक्षणप्रेमी, मुख्याध्यापक व शिक्षकवृंदाने सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.




