ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

मायणी येथील सद्गुरु सरुताई माऊली देवस्थानला ना. जयकुमार गोरे यांच्या आदेशाने ‘ब’ वर्ग दर्जा; २ कोटींच्या विकासकामांना मंजुरी – माजी आमदार डॉ.दिलीपरावजी येळगावकर

ज्येष्ठ पत्रकार प्रा दिलीप पुस्तके सातारा

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

मायणी येथील सद्गुरु सरुताई माऊली देवस्थानला ना. जयकुमार गोरे यांच्या आदेशाने ‘ब’ वर्ग दर्जा; २ कोटींच्या विकासकामांना मंजुरी – माजी आमदार डॉ.दिलीपरावजी येळगावकर

मायणी | प्रतिनिधी
खटाव तालुक्यातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सद्गुरु सरुताई माऊली देवस्थानला महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री ना. जयकुमार गोरे यांच्या आदेशाने ‘ब’ वर्ग दर्जा प्राप्त झाला असून देवस्थानाच्या विकासासाठी तब्बल २ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांना मंजुरी मिळाली आहे, अशी महत्त्वपूर्ण माहिती ट्रस्टचे अध्यक्ष व माजी आमदार डॉ. दिलीपरावजी येळगावकर यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित कार्यक्रमात भाविकांना दिली.
गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वानिमित्त देवस्थान परिसरात धार्मिक व भक्तिमय वातावरणात विविध कार्यक्रम पार पडले. यावेळी संत सद्गुरु सरुताई माऊली यांच्या महाआरतीचा सोहळा डॉ. दिलीपराव येळगावकर व त्यांच्या सौभाग्यवतींसह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मोठ्या भक्तिभावाने संपन्न झाला.
याप्रसंगी सातारा जिल्हा परिषद सदस्य सूरज पाटील, सातारा जिल्हा परिषदेचे माजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी टी. आर. गारळे, सातारा जिल्हा भाजपाचे उपाध्यक्ष डॉ. सुरेशशेठ शिंदे, सौ. वंदना शिंदे, कलेढोणच्या माजी सरपंच सौ. प्रीती शेटे, डॉ. सौ. उर्मिला येळगावकर, सौ. मानसी तोरो, सौ. पल्लवी गुदगे, सौ. नंदा चन्ने, संजय बागल, जालिंदर माळी, संजय गुदगे, सतीश भोसले, सुहास शेटे, अनिल भोसले, मानसिंगराव देशमुख, जनार्दन देशमुख, मार्केट कमिटी वडूजचे संचालक अभिजित देशमुख, अरुणराव चोथे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. दिलीपराव येळगावकर म्हणाले की, “सद्गुरु सरुताई माऊली देवस्थानला ‘ब’ वर्ग दर्जा मिळवण्यासाठी जवळपास २० वर्षांचा संघर्ष करावा लागला. या कामात मंत्री ना. जयकुमार गोरे (भाऊ) यांनी मोलाचे सहकार्य केले. त्यांच्या पुढाकारामुळे ‘ब’ वर्गाचा प्रस्ताव मंजूर झाला आणि देवस्थानाच्या विकासासाठी २ कोटी रुपयांच्या विविध कामांना मान्यता मिळाली.”
या निधीतून भव्य सभामंडप, देवस्थान परिसरात पेव्हर ब्लॉक बसविणे, १० किलोवॅट क्षमतेचा सोलर प्रकल्प, परिसराचे सुशोभीकरण तसेच संरक्षक भिंत (वॉल कंपाऊंड) अशी महत्त्वाची विकासकामे हाती घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी माढा लोकसभेचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, सांगली-सातारा विधान परिषदेचे आमदार धैर्यशीलदादा कदम, फलटणचे आमदार सचिन पाटील तसेच मंत्रीमहोदयांचे सचिव कोठेकर साहेब यांची उपस्थिती लाभल्याचेही त्यांनी नमूद केले.
डॉ. येळगावकर पुढे म्हणाले की, पुढील वर्षी आणखी २ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून घेण्याचा प्रयत्न केला जाणार असून त्यातून वृद्धाश्रम, गोशाळा आणि महाविद्यालय उभारण्याचा मानस आहे. तसेच महादेव मंदिराचा जीर्णोद्धार पुरातत्त्व विभागामार्फत करण्यात येईल. चांद नदीवरील मंदिराकडे जाणारा पूल उभारण्यासाठी सुमारे ३ कोटी रुपयांचा निधी आणला जाईल. याशिवाय भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वडिलांनी मायणी धरणावर सेवा बजावल्याच्या ऐतिहासिक स्मृती जपण्यासाठी ४ कोटी रुपयांचे भव्य स्मारक उभारण्याचाही संकल्प आहे.
टेंभू योजनेचे पाणी मायणी धरणात आल्यामुळे संपूर्ण परिसर बागायती झाला असून आज मायणीला पाणीटंचाईची समस्या जाणवत नसल्याचेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमात सातारा जिल्हा परिषदेचे माजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी टी. आर. गारळे यांनी देवस्थानला ‘ब’ वर्ग दर्जा मिळाल्याबद्दल डॉ. दिलीपराव येळगावकर यांचे अभिनंदन करत, विकासकामांचे योग्य नियोजन करून प्राधान्यक्रम निश्चित करत कामे पूर्ण करण्याचा सल्ला दिला.
गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित या सोहळ्यास हजारो भाविकांनी उत्स्फूर्त उपस्थिती लावली. विशेषतः महिलांचा मोठा सहभाग कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत कुलकर्णी यांनी केले, तर ट्रस्टचे सचिव रविंद्र बाबर यांनी उपस्थित मान्यवर व भाविकांचे आभार मानले.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button