श्रीरामपूर:-बेकायदेशीर भार नियमन बंद करा-अन्यथा कार्यालय बंद करू … जिल्हाध्यक्ष औताडे यांचा इशारा.
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

बेकायदेशीर भार नियमन बंद करा-अन्यथा कार्यालय बंद करू … जिल्हाध्यक्ष औताडे यांचा इशारा.

माळेवाडी ( RPS स्टार न्यूज प्रतिनिधी ):- श्रीरामपूर मुळा प्रवरेच्या कार्यक्षेत्रात वीज वितरण कंपनी श्रीरामपूर उपविभागाअंतर्गत गेल्या चार महिन्यापासून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीररीत्या वीज वितरण कंपनीने भारनियमन केले आहे. याचा फटका वाड्या- वस्त्यावर राहणाऱ्या शेतकरी नागरिकांसह शेती क्षेत्राला बसला आहे.

शेतकऱ्यांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला असल्याने शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे व तालुका अध्यक्ष युवराज जगताप यांच्या शिष्टमंडळाने श्रीरामपूर उपविभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र रजपूत यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले. निवेदन देतेवेळी शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने मुख्य कार्यकारी अधिकारी यांना कंदील, शाल टोपी नारळ देऊन उपरोधिक सत्कार गांधीजींच्या मार्गाने केला व तसेच मागण्या मान्य न झाल्यास व तसे लेखी न मिळाल्यास नेताजींच्या मार्गाने आंदोलन करू असा इशाराही देण्यात आला.
यावेळी झालेल्या दीड तासाच्या चर्चेदरम्यान श्री राजेंद्र रजपूत यांनी भारनियमानाचा विषय आमच्या अधिकार कक्षेत येत नसल्याचे सांगितले असता जिल्हाध्यक्ष औताडे यांनी अहिल्यानगर जिल्हा वीज वितरण कंपनीचे मुख्य अधीक्षक अभियंता श्री पवार साहेब यांना याबाबत फोन केला. त्यांनी लगेच भारनियमनाबाबत शेतीसाठी आठ तास थ्री फेज व पूर्वीप्रमाणे सिंगल फेज विद्युत पुरवठा वाड्यावर राहणाऱ्या शेतकरी नागरिकांसाठी देण्याचे आजपासूनच आश्वासित केले. यावेळी शेतकरी संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले की ‘ श्रीरामपूर उपविभागाच्या शेजारील वैजापूर ,नेवासा, अ.नगर, संगमनेर आदी तालुक्यांमध्ये कुठल्याही प्रकारची वीज कपात केली जात नाही. वास्तविक राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या माध्यमातून ४८ हजार कोटी रुपये शेती क्षेत्राच्या नावाखाली वीज वितरण कंपनीला अदा केल्याचे प्रसिद्धी माध्यमामधून मोठ्या अभिमानाने सांगितले आहे. ज्या अर्थी राज्यातील शेतकऱ्यांच्या वीज बिलांचा भार राज्य सरकार आपल्या तिजोरी मधून कंपनीला देत आहे त्याअर्थी कंपनीने पूर्ण दाबाने २४ तास वीज पुरवठा करणे बंधनकारक आहे. परंतु मागील तीन महिन्यापासून वीज वितरण कंपनीकडून शेतकऱ्यांना शेतीसाठी फक्त ६ तासच वीज पुरवठा केला जात आहे. एप्रिल मे मध्ये ४२ते ४४ डिग्री तापमानामध्ये शेतकऱ्यांना आपल्या पिकांना पाणी देता आले नाही तसेच जून जुलैमध्ये ही तीच परिस्थिती आहे. वाड्यावर राहणाऱ्या शेतकऱ्यांना सिंगल फेज सुद्धा लाईट दिली जात नाही. वन्यप्राणी जीवांचा धोका असताना वीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांना अंधारात ठेवल्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाड्या वस्त्यांवर शेतात राहणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलाबाळांना अभ्यासासाठी सुद्धा लाईट मिळत नाही. त्याचप्रमाणे बहुतांश शेतकऱ्यांकडे संकरित गाईंचे गोठे असून दूध काढण्यासाठी मिल्किंग मशीन चा वापर करावा लागतो विज नसल्यामुळे त्याही समस्येला बहुतंस तरुण दूध उत्पादकांना सामना करावा लागला आहे. सरकारने शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करून अप्रत्यक्ष शेती क्षेत्राची वीजच गायब केली आहे. एकीकडे ऊर्जा खाते वीज वितरण कंपनीला शेतकऱ्यांच्या वीज बिलापोटी हजारो कोटी रुपये अदा केली जातात तर दुसरीकडे वीज वितरण कंपनीने वीजच देण्याचे बंद केले. सदर बात ही भार नियमनच्या नावाखाली एक मोठा घोटाळा दिसून येतो. याबाबत कुठलेही आमदार व खासदार बोलत नाही सदर बाबही चिंतेची व दुर्दैवी आहे.
त्याचप्रमाणे वीज वितरण कंपनी जळालेले ट्रान्सफार्मर (रोहित्र), मुळा प्रवरेच्या कार्यक्षेत्रातील खूप जुने असलेले स्ट्रक्चर यामध्ये पोल, कंडक्टर, विजवाहक तारांना वेढलेली झाडे , झुडपे व वेली याबाबतची कुठलीही देखभाल दुरुस्ती केली जात नाही. ट्रांसफार्मर चे केबल, ऑईल व कट आउट याकडेही दुर्लक्ष केले जाते. वीज वितरण कंपनी श्रीरामपूर उपविभागा अंतर्गत सदर साहित्य खरेदी केले जात नाही का किंवा खरेदी केलेले साहित्य कोठे जाते हाही प्रश्न निर्माण होत आहे. तरी याबाबत मुख्य कार्यकारी अभियंता श्रीरामपूर उपविभाग श्रीरामपूर यांनी तात्काळ दखल घेऊन वीजपुरवठा पूर्वीप्रमाणे सुरळीत करावा व देखभाल दुरुस्तीचे कामे तक्रार आल्यानंतर तात्काळ करून द्यावी अशी मागणी अहिल्यानगर जिल्हा शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे. तरी सदर मागणीचा सहानुभूतीपूर्वक व गांभीर्याने दखल घेऊन कार्यवाही करावी अन्यथा अहिल्यानगर जिल्हा शेतकरी संघटनेच्या वतीने हजारो शेतकऱ्यांचा मोर्चा मंगळवार दिनांक. २८/७/२०२६ रोजी सकाळी साडेदहा वाजता वीज वितरण कंपनीच्या मुख्य कार्यालययावर काढण्यात येऊन कार्यालय बंद करण्यात येईलअसा इशारा शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने दिला. यावेळी जिल्हाध्यक्ष औताडे तालुका अध्यक्ष जगताप,सतीश नाईक, संतोष भालदंड, बाळासाहेब जाधव, सर्जेराव देवकर, शिवाजी दांगट, संजय व मनी, शैलेश वमने, गोकुळ भालदंड, समिर रोकडे, वसंत भालदंड, रावसाहेब गलांडे,, गोरक्षनाथ आढाव, सतीश गायकवाड, गणेश कापसे, दिनेश कापसे, संजय नाईक, मंज्याबापू गलांडे, सुनील नाईक, दिगंबर औताडे, नानासाहेब बहिरट, इंद्रभान चोरमल, साहेबराव चोरमल, शिवाजी काळे आदि शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी कार्यकर्ते उपस्थित होते.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.
ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION



