ताज्या घडामोडी

 

1) अहिल्यानगर:-माजी संरपच कै.रामचंद्र बाबुराव भापकर गुंडेगावच्या जडणघडणीतील एक कर्तृत्ववान पर्व!

गुंडेगावचे माजी सरपंच कै. रामचंद्र बाबुराव भापकर उर्फ आप्पा यांच्या कार्याचा स्मरणलेख…

गुंडेगाव ( अहिल्यानगर) अतुल भापकर

गुंडेगावच्या सामाजिक, राजकीय आणि ग्रामविकासाच्या वाटचालीत आपल्या कार्याचा ठसा उमटविणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे माजी सरपंच कै. रामचंद्र बाबुराव भापकर उर्फ आप्पा. साधेपणा, स्पष्टवक्तेपणा, व्यापक जनसंपर्क, दानशूर वृत्ती आणि गोरगरिबांच्या अडचणीच्या काळात मदतीला धावून जाण्याची वृत्ती ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची प्रमुख वैशिष्ट्ये होती.

*संघर्षातून घडलेले आप्पांचे व्यक्तिमत्त्व*

लहान वयातच मातृछत्र हरपल्याने आप्पांचे बालपण संघर्षमय परिस्थितीत गेले. कुटुंबाची जबाबदारी सांभाळताना त्यांनी मोलमजुरी, सालगडीचे काम, शेती, जनावरे तसेच लाकूडफाट्याच्या व्यवसायातून जीवनाचा संघर्ष केला. या संघर्षातूनच त्यांच्यात कष्ट, जिद्द आणि माणुसकीचे संस्कार अधिक दृढ झाले.
विवाहानंतर त्यांच्या पत्नीनेही कुटुंबाची जबाबदारी समर्थपणे सांभाळत आप्पांच्या सामाजिक कार्याला मोलाची साथ दिली.

*गावाच्या विकासासाठी आप्पांचे आयुष्य समर्पित*

स्वातंत्र्योत्तर काळात आप्पांनी कै. स्वातंत्र्यसैनिक हरिभाऊ भापकर यांच्या कार्याची दखल घेऊन समाजसेवेचा वसा स्वीकारला. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून त्यांनी गावातील विविध प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले. गावातील तंटे मिटविणे, गरजू कुटुंबांना मदत करणे, सोयरीकी जुळवून देणे आणि अडचणीच्या प्रसंगी नागरिकांच्या पाठीशी उभे राहणे, यामुळे त्यांचा जनसंपर्क मोठा झाला.ग्रामपंचायत आणि सरपंचपदाच्या माध्यमातून त्यांनी गावाच्या विकासासाठी विविध कामांना चालना दिली. बंधारे, तळी, जलसंधारण, मंदिरांचे जिर्णोद्धार, वृक्षलागवड आणि सार्वजनिक विकासकामे यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. गावातील सामाजिक सलोखा टिकवून ठेवण्यासाठी तसेच विविध गटांतील मतभेद कमी करण्यासाठीही त्यांनी सातत्याने प्रयत्न केले.

*गोरगरिबांचा कैवारी आणि दानशूर व्यक्तिमत्त्व…*

आप्पांकडे गोरगरिबांचा मोठा वर्ग आपलेपणाने पाहत असे. अनेक कुटुंबांच्या अडचणीच्या काळात त्यांनी आर्थिक व सामाजिक मदतीचा हात दिला. गुंडेगावचे कुलदेवता तुकाई माता मंदिरांच्या जीर्णोध्दारासाठी त्यांनी मोठे योगदान दिले. या मंदिराच्या कामासाठी सुमारे साडेतीन लाख रुपयांची देणगी देऊन ग्रॅनाइट व फरशीचे काम करून दिल्याचे सांगितले जाते.धर्म, समाज आणि गावाच्या परंपरांशी त्यांचे अतूट नाते होते. गावातील धार्मिक व सामाजिक उपक्रमांना त्यांनी नेहमीच पाठबळ दिले.

*राजकीय मतभेदांपलीकडे मैत्री जपणारे आप्पांचे व्यक्तिमत्त्व…*

गुंडेगावच्या सामाजिक आणि राजकीय जीवनात आप्पांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. राजकारणात मतभेद आणि प्रतिस्पर्धा असली, तरी वैयक्तिक संबंधांमध्ये कटुता येऊ नये, ही त्यांची भूमिका होती. राजकीय प्रतिस्पर्धी असलेले कै. माजी सरपंच भानुदास बाबूराव कोतकर आणि माजी सरपंच रघुनाथ राजाराम हराळ यांच्याशीही आप्पांनी मैत्रीचे आणि आपुलकीचे संबंध जपले.
गावच्या राजकारणात वेगवेगळ्या भूमिका असतानाही त्यांनी व्यक्ती आणि विचार यामध्ये फरक ठेवला. राजकीय मतभेदांना वैयक्तिक संबंधांमध्ये येऊ न देता सर्वांशी सलोख्याचे संबंध ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न असे. त्यामुळेच विविध विचारांच्या आणि राजकीय गटांच्या लोकांमध्येही आप्पांविषयी आदराची भावना होती.
गावाच्या विकासासाठी आवश्यक असताना मतभेद बाजूला ठेवून एकत्र येणे, सामाजिक सलोखा टिकवणे आणि गावातील वातावरण सौहार्दपूर्ण ठेवणे, हा त्यांच्या सार्वजनिक जीवनातील महत्त्वाचा पैलू होता. राजकारणात प्रतिस्पर्धी, मात्र माणुसकीत सहकारी, ही आप्पांच्या व्यक्तिमत्त्वाची ओळख त्यांच्या कार्यातून दिसून येते.
त्यांच्या या स्वभावामुळेच राजकीय जीवनातील अनेक संबंध काळाच्या ओघातही टिकून राहिले. आजच्या पिढी साठीही राजकीय मतभेद असले तरी सामाजिक आणि वैयक्तिक नातेसंबंध जपण्याचा हा आदर्श निश्चितच प्रेरणादायी आहे.

मोडी लिपीतील सही—आप्पांची खास ओळख आज अनेक माजी विद्यार्थीच्या स्मरणात!

गुंडेगावच्या संरपच पदावर असताना शाळेतील विद्यार्थीच्या फि सवलती फार्म वर कै. रामचंद्र बाबुराव भापकर उर्फ आप्पांची मोडी लिपीतील वैशिष्ट्यपूर्ण सही ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची आणि त्या काळातील त्यांच्या कार्याची एक वेगळीच ओळख होती. काळ बदलला, पिढ्या बदलल्या; मात्र त्यांच्या सहीची आठवण आणि त्यामागची आप्पांची ओळख आजही अनेक विद्यार्थ्यांच्या स्मरणात आहे. त्यांच्या कार्याच्या स्मृती जपताना ही सही म्हणजे आप्पांच्या आठवणींची एक जिवंत खूण ठरते.

आप्पांनी भापकर कुटुंबातील अनेक तरुणांना नेतृत्वाची संधी व मार्गदर्शन.

आप्पांनी पुढील पिढीला नेतृत्वाची संधी मिळावी, यासाठीही प्रयत्न केले. त्यांच्या पुतणे माजी उपसरपंच संतोष भापकर , व अनिल भापकर, झुंबर भापकर मेजर, सोपान भापकर मेजर यांना गावच्या राजकीय धार्मिक कार्यात जबाबदारी घेण्यासाठी आप्पांनी नेहमीच प्रोत्साहन केले . शेवटपर्यंत गावच्या सामाजिक व्यवस्थेशी त्यांचे नाते कायम राहिले.

गुंडेगावच्या इतिहासात माजी सरपंच कै. रामचंद्र बाबुराव भापकर उर्फ आप्पा नाव कायम स्मरणात…

कै. रामचंद्र बाबुराव भापकर उर्फ आप्पा हे केवळ माजी सरपंच नव्हते; ते गावातील अनेक कुटुंबांचे मार्गदर्शक, गोरगरिबांचे आधारवड, सामाजिक सलोखा जपणारे नेतृत्व आणि गुंडेगावच्या जडणघडणीत योगदान देणारे व्यक्तिमत्त्व होते.
त्यांनी जपलेली माणुसकी, केलेली समाजसेवा आणि गावासाठी दिलेले योगदान पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल. गुंडेगावच्या इतिहासात आप्पांचे नाव कायम आदराने स्मरणात राहील.

आप्पांना भावपूर्ण आदरांजली!
कै. रामचंद्र बाबुराव भापकर उर्फ आप्पा

“एक व्यक्तिमत्त्व… एक पर्व… आणि गावाच्या आठवणींमध्ये कायम जिवंत राहणारी प्रेरणादायी आठवण!”

2) अहिल्यानगर:-नगरच्या मातीतलं विखे कुटुंब… आणि साता समुद्रापार स्वीडनच्या संसदेत पोहोचलेली नात!

 

महाराष्ट्राच्या राजकारणात विखे पाटील हे नाव नवीन नाही.
सहकार, शिक्षण आणि राजकारणाचा मोठा वारसा असलेल्या या कुटुंबाची एक वेगळीच कहाणी आता साता समुद्रापार पोहोचली आहे…

नीला विखे पाटील. महाराष्ट्रातील अहमदनगरशी घट्ट नातं असलेल्या नीला विखे पाटील यांची स्वीडनच्या संसदेत खासदार म्हणून निवड झाली आहे. स्टॉकहोम सिटी मतदारसंघातून त्यांनी संसदेत प्रवेश केला आहे.
पण ही केवळ एका निवडणुकीची गोष्ट नाही… ही आहे एका राजकीय कुटुंबातून आलेल्या मुलीने परदेशात स्वतःची राजकीय ओळख निर्माण करण्याची कहाणी!

जन्म स्वीडनमध्ये, बालपण नगरच्या मातीत
नीला यांचा जन्म स्वीडनमध्ये झाला. मात्र त्यांच्या बालपणातील काही वर्षे अहिल्यानगर मध्ये गेली. त्यामुळे एका बाजूला महाराष्ट्राची माती आणि दुसऱ्या बाजूला स्वीडनचे वातावरण—अशी दोन संस्कृती त्यांच्या आयुष्याचा भाग बनल्या. त्यांचे वडील डॉ. अशोक विखे पाटील हे शिक्षण क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व असून विखे पाटील फाउंडेशनशी संबंधित आहेत.

नीला या महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री बाळासाहेब विखे पाटील यांच्या नात आहेत. तर महाराष्ट्राचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या त्या पुतणी आहेत.
म्हणजेच… अशी विखे कुटुंबाची पुढची पिढी आता स्वीडनच्या राजकारणात पोहोचली आहे.

शिक्षणही भारतापुरतं मर्यादित राहिलं नाही!
नीला यांनी स्वीडन, स्पेन आणि युरोपातील विविध ठिकाणी शिक्षण घेतले. गॉथेनबर्ग स्कूल ऑफ बिझनेसमधून त्यांनी अर्थशास्त्र आणि कायदा या विषयांचा अभ्यास केला. त्यानंतर माद्रिदमधील युनिव्हर्सिटी ऑफ कॉम्प्लुटेन्स येथे एमबीएचे शिक्षण घेतले. त्यांना स्वीडिश, इंग्लिश आणि स्पॅनिश भाषांचे ज्ञान आहे. पण शिक्षणानंतर त्या केवळ नोकरीच्या मार्गावर गेल्या नाहीत… त्यांनी राजकारणाची वाट निवडली.

वयाच्या १६व्या वर्षी राजकारणात प्रवेश!
नीला यांनी किशोरवयातच स्वीडनच्या राजकारणात रस घ्यायला सुरुवात केली. वयाच्या १६व्या वर्षी त्यांनी सोशल डेमोक्रॅटिक पक्षाचे सदस्यत्व घेतल्याचे वृत्त आहे. पुढे त्या स्वीडनच्या ग्रीन पार्टीशी सक्रियपणे जोडल्या गेल्या आणि यंग ग्रीन्स, ग्रीन स्टुडंट्स तसेच पक्षाच्या स्थानिक संघटनांमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या. म्हणजे राजकारण त्यांच्यासाठी अचानक आलेली गोष्ट नव्हती… तरुण वयापासून त्यांनी त्या राजकीय व्यवस्थेत काम करत स्वतःचा प्रवास तयार केला.

पंतप्रधान कार्यालयापर्यंत पोहोचल्या!
राजकारणातील कामाचा अनुभव वाढत गेला आणि नीला यांना स्वीडनच्या पंतप्रधान कार्यालयात राजकीय सल्लागार म्हणून काम करण्याची संधी मिळालीमिळाली. माजी पंतप्रधान स्टेफान लोफवेन यांच्या कार्यकाळात त्यांनी वित्त, करप्रणाली, अर्थसंकल्प आणि गृहनिर्माण यांसारख्या विषयांवर काम केले.
त्यानंतर त्या स्टॉकहोमच्या स्थानिक राजकारणातही निवडून आल्या.

थेट स्वीडनच्या संसदेत!
२०२६ च्या स्वीडिश निवडणुकीत नीला विखे पाटील यांची स्टॉकहोम सिटी मतदारसंघातून स्वीडनच्या ३४९ सदस्यांच्या संसदेत निवड झाली. हा क्षण केवळ विखे कुटुंबासाठीच नव्हे, तर महाराष्ट्राशी नातं असलेल्या लोकांसाठीही चर्चेचा विषय ठरला आहे. विशेष म्हणजे, निवडून आल्यानंतर नीला यांनी बालकल्याण आणि पर्यावरण या विषयांवर काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मतदानाचा अधिकार नसलेल्या लोकांचाही आवाज बनण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली.

पण नगरशी नातं अजूनही कायम…
स्वीडनच्या संसदेत पोहोचूनही नीला आपल्या भारतीय आणि महाराष्ट्रीय मुळांपासून दूर गेलेल्या नाहीत. त्यांनी भारताबद्दल आपल्याला खूप प्रेम आणि आपुलकी असल्याचे सांगितले आहे. त्यांच्या आजोबा बाळासाहेब विखे पाटील यांच्याशी असलेल्या आठवणीही त्यांनी सांगितल्या. एका मुलाखतीत त्यांनी सांगितले की, त्या १५ वर्षांच्या असताना आजोबांनी त्यांना राज्याचा अर्थसंकल्प वाचायला दिला होता.

आजोबांनी दिलेला तो राजकीय धडा… आणि आज नात स्वीडनच्या संसदेत! हीच कदाचित एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाणाऱ्या राजकीय वारशाची वेगळी कहाणी आहे.

अहिल्यानगर अर्थात तात्कालीन अहमदनगरच्या मातीत रुजलेलं विखे पाटील कुटुंब…आणि साता समुद्रापार स्वीडनच्या संसदेत पोहोचलेली त्यांची पुढची पिढी!

नगर ते स्टॉकहोम… विखेंचा राजकीय प्रवास खरोखरच साता समुद्रापार पोहोचला!
त्यांना पुढील राजकीय आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.

 

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button