आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वाई:-संघर्षाच्या वाटेवरून ‘डॉक्टरेट’पर्यंत; प्रा.रवींद्र जमदाडे यांची प्रेरणादायी झेप.

पत्रकार सारिका गवते सातारा जिल्हा महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

वाई:-संघर्षाच्या वाटेवरून ‘डॉक्टरेट’पर्यंत; प्रा.रवींद्र जमदाडे यांची प्रेरणादायी झेप.

सातारा | वाई, दि. २१ : प्रतिकूल परिस्थितीवर मात करत, शेतकरी कुटुंबातून आलेल्या वाईच्या किसन वीर महाविद्यालयातील प्रा. रवींद्र सुरेश जमदाडे यांनी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने त्यांना वाणिज्य व व्यवस्थापन विषयातील ‘पीएच.डी.’ पदवी प्रदान केली आहे. त्यांच्या या यशामुळे कुटुंबीय, सहकारी आणि शैक्षणिक क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

प्रा. जमदाडे हे किसन वीर महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असून, सध्या याच महाविद्यालयाच्या वाणिज्य व व्यवस्थापन विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. शिक्षणाची प्रबळ इच्छाशक्ती, सातत्यपूर्ण परिश्रम आणि संशोधनाची चिकाटी यांच्या जोरावर त्यांनी डॉक्टरेटपर्यंतचा टप्पा गाठला.

त्यांच्या संशोधन कार्यासाठी पुणे येथील डी. वाय. पाटील स्कूल ऑफ मॅनेजमेंटचे प्रा. डॉ. ई. बी. खेडकर तसेच त्यांच्या सहकाऱ्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या यशात आई-वडील व कुटुंबीयांचे पाठबळ, तसेच जनता शिक्षण संस्था आणि किसन वीर महाविद्यालयाचे प्रोत्साहन महत्त्वाचे ठरल्याचे प्रा. जमदाडे यांनी सांगितले.

दरम्यान, उच्च शैक्षणिक पदवी संपादन केल्याबद्दल जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार मदनदादा भोसले यांच्या हस्ते डॉ. रवींद्र जमदाडे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे सचिव डॉ. जयवंत चौधरी, शेखर गायकवाड यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

डॉ. जमदाडे यांच्या यशाबद्दल संस्थेचे उपाध्यक्ष शंकरराव गाढवे, सचिव डॉ. जयवंत चौधरी, खजिनदार प्रा. नारायण चौधरी, संचालक मंडळ, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे, उपप्राचार्य प्रा. विनोद वीर, प्राध्यापकवृंद तसेच कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.

शेतकरी कुटुंबातून आलेल्या एका तरुणाने जिद्द, मेहनत आणि सातत्याच्या जोरावर मिळवलेले हे यश विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणारे आहे.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button