आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वाई:-भुईंज पोलिसांच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद: ३९ पैकी १५ गावांत ‘एक गाव एक गणपती’ संकल्पना यशस्वी.

पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला संघटक

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

वाई:-भुईंज पोलिसांच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद: ३९ पैकी १५ गावांत ‘एक गाव एक गणपती’ संकल्पना यशस्वी.


१८१ गणेश मंडळांकडून डी.जे./डॉल्बीला फाटा; पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणुकींवर भर
पोलीस प्रशासनाच्या नियोजनाचे ज्येष्ठ नागरिक व महिला वर्गाकडून कौतुक

भुईंज (विशेष प्रतिनिधी):
भुईंज पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये यंदाच्या गणेशोत्सवात कायदा, सुव्यवस्था व शांतता अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने हाती घेतलेल्या उपक्रमांना अभूतपूर्व यश मिळाले आहे. पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ३९ गावांमध्ये पोलीस ठाण्यामार्फत ‘एक गाव एक गणपती’ संकल्पना राबवण्यात आली होती. त्याला १५ गावांनी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद देत ही संकल्पना प्रत्यक्ष अंमलात आणली आहे.
पोलीस प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत मौजे भिवडी, चांदवडी, वेलंग, खोलवडी, बोपेगाव, चिंधवली, रायगाव, काळंगवाडी, महामुलकरवाडी, निकमवाडी, गोवेदिगर, अमृतवाडी, राऊतवाडी, लगडवाडी आणि मापरवाडी या १५ गावांनी ‘एक गाव एक गणपती’ ची स्थापना करून समाजात आदर्श आणि एकोप्याचा संदेश दिला आहे.
डी.जे. व डॉल्बीला पूर्णत: बंदी, पारंपरिक वाद्यांना प्राधान्य
ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी व उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस ठाणे हद्दीतील १८१ गणेश मंडळांना डी.जे. व डॉल्बी बंदीबाबत आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला सर्वच मंडळांनी सहकार्य केले आहे. गणपती आगमनाच्या मिरवणुकीत कोणत्याही मंडळाने डी.जे.चा वापर केला नाही. तसेच, आतापर्यंत विसर्जन झालेल्या ८ गणेश मंडळांनीदेखील पारंपरिक वाद्यांच्या गजरात अत्यंत उत्साहात व शांततेत विसर्जन मिरवणुका पार पाडल्या आहेत.
पोलीस अधिकाऱ्यांच्या उत्कृष्ट कामगिरीचे कौतुक
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी भुईंज पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी तथा परिविक्षाधीन पोलीस उप अधीक्षक पूनम झगडे मॅडम आणि सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या मार्गदर्शन व कडक नियोजनामुळेच हद्दीत शांतता व सुव्यवस्था राखणे शक्य झाले आहे.
पोलीस प्रशासनाच्या या शिस्तबद्ध आणि कौतुकास्पद कामगिरीमुळे भुईंज व परिसरातील ज्येष्ठ नागरिक, महिला वर्ग व नागरिकांमधून अत्यंत समाधान व्यक्त केले जात आहे.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button