श्रीरामपूर:-माळेवाडीत पावसासाठी महापर्जन्यवृष्टी यज्ञ सोहळा संपन्न.
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

श्रीरामपूर:-माळेवाडीत पावसासाठी महापर्जन्यवृष्टी यज्ञ सोहळा संपन्न.

संत जनार्दन स्वामी ज्ञानमंदिर कुटिया परिसरात ग्रामस्थ तरुण व भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग.
माळेवाडी ( RpS स्टार न्युज प्रतिनिधी ) माळेवाडी गावात पर्जन्यवृष्टी व्हावी या उद्देशाने ग्रामस्थ भजनी मंडळ तरुण वर्ग शिवभक्त तसेच संत जनार्दन स्वामी भक्त परिवाराच्या सहकार्याने महापर्जन्यवृष्टी यज्ञाचे आयोजन करण्यात आले
संत जनार्दन स्वामी ज्ञान मंदिर कुठे या शेजारी नवीन महादेव मंदिराचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी हा यज्ञ धार्मिक विधीपूर्वक पार पडला . यावेळी ग्रामस्थ व धार्मिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
यज्ञामध्ये वड पिंपळ तरवड नंबर रुई यांसारख्या वनस्पतीच्या फांद्या व पाणी तसेच मीठ आणि विविध यज्ञसामग्रीचा वापर करण्यात आला पर्जन्यूवृष्टीसाठी पारंपारिक धार्मिक श्रद्धेसोबत पर्यावरणीय व वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही या उपक्रमाकडे पाहिले जात असल्याचे आयोगांनी सांगितले
गावात चांगला पाऊस पडून शेती व ग्रामस्थांना दिलासा मिळाला अशी भावना यावेळी उपस्थितांना व्यक्त केली.




