श्रीरामपूर:-“हरेगावच्या स्वाभिमान भूमीवर रिपब्लिकन सेनेची दमदार एंट्री! समाजविकासासाठी सत्तेसोबत राहून लढणार – चरणदादा त्रिभुवन”
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

“हरेगावच्या स्वाभिमान भूमीवर रिपब्लिकन सेनेची दमदार एंट्री! समाजविकासासाठी सत्तेसोबत राहून लढणार – चरणदादा त्रिभुवन”

श्रीरामपूर (RPS स्टार न्यूज प्रतिनिधी) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मौजे हरेगाव येथील स्वाभिमान भूमीवर रविवारी (दि. १९ जुलै २०२६) सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन सेना शाखेच्या फलकाचे अनावरण व शाखेचे उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. या कार्यक्रमाचे उद्घाटन रिपब्लिकन सेनेचे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष चरणदादा त्रिभुवन यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना चरणदादा त्रिभुवन म्हणाले, “समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी काळाची गरज ओळखून सत्तेसोबत राहून समाजहिताची विकासकामे करणे आवश्यक आहे. रिपब्लिकन सेना ही समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी आणि सर्वांगीण विकासासाठी सातत्याने संघर्ष करत राहील.”
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष दिलीपराव त्रिभुवन यांनी समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि विकासात्मक कार्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन करत शाखेच्या कार्याला शुभेच्छा दिल्या.
यावेळी रमेश भालेराव यांनी हरेगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने पाठपुरावा करून आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचा विश्वास व्यक्त केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना दीपक नवगिरे यांनी सांगितले की, सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत युती असल्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली हरेगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसराचा विकास तसेच बुद्ध विहार उभारणीसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शिवा साठे, दर्शना काळे, अलका शेलार, शीतल जाधव, बाबाभाई शेख, दिनेश काळे तसेच रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी सुनिल पवार, अशोक बोधक, सूर्यकांत चाबुस्वार, व्हसाले गुरुजी, गुलाब पठारे, सुरेश भालेराव, शिवा चाबुकस्वार, शक्ती खरात, राहुल निकम, नरवडे दादा, काशिनाथ जगताप, अशोक शरणागते, भारत गायकवाड, जनार्दन दुशिंग, रामचंद्र आव्हाड, गौतम बोर्डे, दिनकर धनेधर, विनायक साठे, अरुण भालेराव यांच्यासह असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक दीपक नवगिरे, सूत्रसंचालन राहुल वाघ यांनी केले, तर बाळासाहेब त्रिभुवन यांनी आभार प्रदर्शन केले. उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली.




